लोकप्रवाह, चोपडा दि. २५ – येथील पोस्ट आॕफीसमध्ये शहर व तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिक हे त्यांचे बचत खाते व इतर सुविधांकरीता दररोज ये-जा करत असतात. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून तांत्रिक अडचणीमुळे “सर्व प्रकारच्या सेवा बंद आहे” असा फलक पोस्ट ऑफिसच्या मुख्य गेटवर लावण्यात आला आहे. सदर बंदमुळे शहर व तालुक्यातून येणाऱ्या ग्राहकांना प्रचंड त्रास होतोय. यामुळे पोस्ट आॕफीसला हेलपाटे मारुन वेळ वाया जात असल्याने नागरिकांमध्ये ओरड निर्माण होत आहे.
गेल्या तीन ते चार दिवसापासुन तांत्रिक अडचणी असल्या कारणामुळे संपुर्ण कामकाज बंद आहे. या संदर्भात विभागीय कार्यालयाशी व आय.टी.विभागाशी संपर्क सुरु आहे. लवकरच सेवा पुर्ववत सुरु होईल.
मनोज पाटील
पोस्टमास्तर, चोपडा
त्यातच एका ग्राहकाने पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांला विचारले असता त्यांनी सदर ग्राहकाला तांत्रिक अडचणीबाबत समजावून न सांगता उर्मट भाषेत उत्तर दिले. यामुळे ग्राहकांमध्ये संबंधित यंत्रणेविषयी मनात चीड निर्माण होवू शकते. यामध्ये काही लोकांची पोस्ट आँफीस बचत योजना, जेष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय बचत योजना, वेळ ठेव योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृद्धी योजना, किसान विकास पञ, पोस्ट आँफिस आवर्ती ठेव, पोस्ट आॕफिस उत्पन्न योजना व राष्ट्रीय बचत ठेव खाते अशा विविध प्रकारच्या योजना तसेच रजिस्टर पोस्ट, साधे पोस्ट व इतर कामांचा यामुळे खोळंबा होवून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
या बंदमुळे वेळेवर भरणा न झाल्यामुळे ग्राहकांना कुठलाही आर्थिक फटका बसु नये अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे. तरी चोपडा येथील पोस्ट ऑफिस संदर्भातील तांत्रिक अडचण लवकरात लवकर दुर व्हावी व सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू व्हावे तसेच ग्राहकांना कुठलाही नाहक त्रास होवू नये अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.
Post Views: 207