Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
in चोपडा, शासकीय
0
राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14: मा. उच्च न्यायालय, मुंबई तसेच मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी चोपडा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली. या लोक अदालतीत दिवाणी व फौजदारी मिळून एकूण 92 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून 17 लाख 95 हजार 370 रुपयांची वसुली करण्यात आली.
चोपडा न्यायालयात प्रलंबित असलेल्या दिवाणी व फौजदारीच्या 451 प्रकरणांपैकी 77 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात फौजदारीची 53 प्रकरणे, धनादेश अनादराची 9 प्रकरणे, पती-पत्नीच्या कौटुंबिक वादाचे 1 प्रकरण तसेच दिवाणीची 14 प्रकरणे निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमधून 14 लाख 11 हजार रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, बीएसएनएल तसेच महाराष्ट्र राज्य वीज मंडळ यांच्या दाखलपूर्व एकूण 2579 प्रकरणांपैकी 15 प्रकरणे निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमधून 3 लाख 84 हजार 370 रुपयांची वसुली झाली.

राष्ट्रीय लोक अदालतीला सकाळी 10.30 वाजता सुरुवात झाली. यावेळी पॅनलवर दिवाणी न्यायाधीश श्री. एस. डब्ल्यू. शेगोकार यांच्या अध्यक्षतेखाली सहपंच म्हणून ॲड. बी. आर. पाटील, चोपडा वकील संघाचे सदस्य तसेच सरकारी अभियोक्ता नितीन माळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बार असोसिएशनचे वकील सदस्य, पोलिस कर्मचारी, सहाय्यक अधीक्षक, न्यायालयीन कर्मचारी, विविध बँकांचे शाखा अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य वीज मंडळ व बीएसएनएलचे अधिकारी यांचे सहकार्य लाभले. पॅनल प्रमुखांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले.

Post Views: 432
Previous Post

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

Next Post

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

Next Post
टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us