Wednesday, July 22, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात तीन दिवसीय विद्यापीठस्तरीय कला गुण कौशल्य कार्यशाळा उत्साहात संपन्न

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
March 8, 2026
in चोपडा, जळगांळ जिल्हा, शैक्षणिक
0
आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 08 :  येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ ते ७ मार्च २०२६ दरम्यान तीन दिवसीय विद्यापीठस्तरीय कला गुण कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या समारोप सोहळा दि. ७ मार्च २०२६ रोजी स्मार्ट हॉल येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. संजय पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
    या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यार्थी विकास संचालक डॉ. चंद्रशेखर वाणी व धुळे जिल्हा समन्वयक विवेकानंद चव्हाण यांचे सहकार्य लाभले. या शिबिराच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे हे उपस्थित होते. याप्रसंगी कार्यशाळा निरीक्षक डॉ. स्वप्निल खरे, डॉ. अजय पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एम. बागुल, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, प्र. रजिस्ट्रार डी. एम. पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. डी. डी. कर्दपवार आदि मान्यवर उपस्थित होते.
      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. डी. डी. कर्दपवार यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी तीन दिवसातील विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी विविध जिल्ह्यातील विद्यार्थी हिमांशु बागुल, प्रमोदकुमार चौरसिया, कक्षा देसले, गायत्री जाधव, निलेश भोई, प्रग्नेश झांबरे यांनी आपल्या मनोगतातून कार्यशाळेच्या उत्कृष्ट आयोजन व नियोजनाबद्दल  कौतुक केले. याप्रसंगी कार्यशाळा निरीक्षक स्वप्नील खरे यांनी महाविद्यालयाचे कौतुक करतांना सांगितले की, कार्यशाळेत आयोजित केलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी भविष्यात कला क्षेत्रात निश्चितच प्रगती करतील असे मत व्यक्त केले.
उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ. संजय पाटील
   याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सदर कार्यशाळा महत्वाची असल्याचे स्पष्ट केले. तसेच जीवनातील प्रत्येक ठिकाणी कला गुण कौशल्य आत्मसात केल्यास यशस्वी होणे तसेच जीवन जगणे सोपे होईल. यावेळी त्यांनी महाविद्यालयाने कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले.
    अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे यांनी विविध उदाहरणातून जीवनातील नृत्य नाट्य, संगीत यांचे महत्व समजावून सांगितले व शेवटी विद्यार्थ्यांना भविष्यात या कार्यशाळेतील प्रात्यक्षिकांचा फायदा होईल यात शंका नाही असे मत व्यक्त केले. या समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सौ. पी. एम. रावतोळे यांनी केले तर आभार डॉ. सौ. के. एस. क्षीरसागर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन व संयोजन समिती प्रमुख, सदस्य व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्रतिनिधी उपस्थित होते.
Post Views: 319
Previous Post

पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

Next Post

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

Next Post
चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

संकटात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पोलीस निरीक्षक पवन देसले; कॅन्सरग्रस्त होमगार्डला चोपडा शहर पोलिसांकडून ₹२५ हजारांची आर्थिक मदत

by टीम लोकप्रवाह
July 9, 2026
0

चोपडा (प्रतिनिधी) : "पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे नसून संकटसमयी आपल्या सहकाऱ्यांसाठी कुटुंबाप्रमाणे उभे राहणारे कुटुंब आहे," याची प्रचिती...

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

बेघर व गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

by टीम लोकप्रवाह
June 19, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा - जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तसेच “अपनाही घर प्रतिष्ठान संचलित मानव सेवा...

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात एसीबीची मोठी कारवाई; उपनिबंधक अधिकाऱ्याकडून १ कोटी ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by टीम लोकप्रवाह
May 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि. २२ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या जळगाव पथकाने मोठी कारवाई करत जामनेर येथील उपनिबंधक सहकारी संस्था...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us