Thursday, September 10, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

विरोधानंतरही नगराध्यक्षांच्या वाहनास इंधन-चालक सुविधा बहुमताने मंजूर; विरोधी गटनेते गजेंद्र जैस्वाल यांचा आरोप

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
in चोपडा, जळगांळ जिल्हा, राजकीय
0
चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11 : चोपडा नगरपरिषदेत ५ मार्च रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत विविध ६६ विषयांवर चर्चा झाली. यामधील विषय क्रमांक ५४ हा नगराध्यक्षांच्या खाजगी वाहनासाठी नगरपरिषदेकडून इंधन व चालक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा ठराव होता. या ठरावाला विरोधी सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवला असतानाही तो सत्ताधारी सदस्यांच्या बहुमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती नगरपालिका विरोधी पक्षाचे गटनेते गजेंद्र जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. जैस्वाल म्हणाले की, शासनाच्या निर्देशांनुसार ज्या नगरपरिषदांचा आस्थापना खर्च ४५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्यांनाच अध्यक्षांना वाहन सुविधा देण्याची मुभा आहे. मात्र सभेत आस्थापना खर्चाचा तपशील सादर करण्यात आला नसताना हा ठराव कसा वैध ठरू शकतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पत्रकार परिषदेला नगरसेविका संध्या महाजन, नगरसेवक शरद पाटील, डॉ. रोहन पाटील, नरेश महाजन आदी उपस्थित होते.
काटकसरीच्या निर्देशांकडे दुर्लक्ष – विरोधी पक्षाचा आरोप
गटनेते जैस्वाल यांनी सांगितले की, शासनाच्या निर्देशांनुसार नगरपरिषदांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या वाहनावरील खर्चात कपात करणे अपेक्षित आहे. तरीही नगराध्यक्षांच्या वाहनासाठी इंधन व चालक उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला विरोधी सदस्यांनी कडाडून विरोध केला.
या चर्चेदरम्यान नगराध्यक्षांनी “मग मी नगरपरिषदेच्या खर्चातून ४० लाखांची गाडी घेते” असे वक्तव्य केल्याचा आरोपही जैस्वाल यांनी केला. जनतेच्या करातून येणाऱ्या निधीबाबत हे वक्तव्य असंवेदनशील असल्याचे त्यांनी म्हटले.
दालन नूतनीकरणाच्या प्रस्तावावरही प्रश्नचिन्ह
सभेत विषय क्रमांक ३४ अंतर्गत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या दालनांच्या नूतनीकरणाचा प्रस्तावही ठेवण्यात आला. सिव्हिल वर्क आणि फर्निचरवर खर्च करण्याचा प्रस्ताव असताना, सध्या नगरपरिषदेत सुसज्ज एसी दालन उपलब्ध असतानाही अनावश्यक तोडफोड व खर्च का करायचा, असा सवाल विरोधी सदस्यांनी उपस्थित केला.
विरोधी सदस्यांच्या म्हणण्यानुसार, नगरपरिषदेत ९५ कंत्राटी कामगारांना मागील पाच महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही, तसेच अनेक बिले प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत निधीचा वापर जनतेच्या हितासाठीच होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
“सभेची गरिमा टिकवणे महत्त्वाचे”
नगरपरिषद सर्वसाधारण सभा ही लोकशाहीचे प्रतीक असून ती कुठल्याही हुकूमशहाचा दरबार नाही, असे संध्या महाजन यांनी सांगितले. सभेदरम्यान मंजूर विषयांचे वाचन करू न देणे, सदस्यांना पुरेसा वेळ न देणे अशा प्रकारांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. या संदर्भात कलम ३०८ अंतर्गत पुढील कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
पत्रकार परिषदेस उपस्थित गटनेते गजेंद्र जैस्वाल, नगरसेविका संध्या महाजन, नगरसेवक डॉ. रोहन पाटील, शरद पाटील व नरेश महाजन
नगराध्यक्षांच्या वक्तव्यावर टीका
“चोपडा शहराच्या प्रथम नागरिक असूनही सभेत नगरसेवकांचे ‘मॅनर्स’ व ‘कॉमन सेन्स’ काढण्याची भाषा वापरणे नगराध्यक्षांना शोभणारे नाही,” अशी टीका नगरसेवक डॉ. रोहन पाटील यांनी केली. हे वक्तव्य त्यांच्या बालिश वृत्तीचे उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Post Views: 360
Previous Post

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

Next Post

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

Next Post
राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

चोपड्यात अतिक्रमणावर हातोडा; रस्ते झाले मोकळे!

by टीम लोकप्रवाह
August 28, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 28 : शहरातील रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्यासह शहराचे सौंदर्य वाढविण्याच्या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेने अतिक्रमणाविरोधात...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us