लोकप्रवाह, चोपडा दि. २५ डिसें. – येथील तापी सहकारी शेतकरी सुतगिरणीच्या आज झालेल्या निवडणुकीत एकुण १० हजार ६२० मतदारांपैकी तब्बल ८ हजार १५३ मतदारांनी हक्क बजावला. त्यामुळे ७६.७७ टक्के मतदान झाले आहे. सूतगिरणी संचालक मंडळाच्या या पंचवार्षिक निवडणुकीत २१ जागांसाठी तब्बल ५३ उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यांचे भवितव्य आज रोजी मतपेटीत बंद झाले असून उद्या दि. २६ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे उद्या कोण बाजी मारणार? याकडे संपुर्ण चोपडा तालुक्यासह जिल्ह्याचे सुद्धा लक्ष लागुन आहे.
चोपडा तापी सहकारी सुतगिरणीवर गत पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध होऊन सर्वपक्षीय पॅनलची सत्ता होती. यावेळी २०२२-२७ या पंचवार्षिक कालावधीत २१ संचालकांच्या जागांसाठी ५३ जण रिंगणात होते यासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली आहे. एकुण २१ मतदान केंद्रावर मतदानप्रक्रिया पार पडली. मतदान केंद्रनिहाय झालेले मतदान असे, चोपडा (१५४६) चहार्डी (७८४) हातेड बु.(७६१) घोडगाव (६७८)लासुर (३२९) चुंचाळे (४३१)आडगाव (३७१) वर्डी (४६०)अडावद (८३३) धानोरा (४११) गोरगावले बुद्रुक (४४२) कठोरा (४००) कुरवेल (७०७) असे एकूण ८ हजार १५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.