लोकप्रवाह, यावल दि. १५ जून – येथील तहसील कार्यालयातील कोषागार विभागातील अव्वल कारकुन मुक्तार फकीरा तडवी वय: ५६ वर्षे रा. लोकेश नगर , यावल या कर्मचाऱ्यास 500 रुपयाची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.
याबाबत सविस्तर असे की, मोहराळे ता. यावल येथील तक्रारदार यांचे वडीलांचे नावे मौजे मोहराळे शिवारात शेतजमिन असून त्या शेतजमीनीचे खरेदी-विक्री व्यवहाराबाबत वाद-विवाद होते. त्यामुळे सदर वाद-विवादाबाबत तहसिलदार, यावल यांचेकडे दावा दाखल केला गेला होता. सदर दाखल केलेल्या दाव्यामधील तहसिलदार, यावल यांनी दिलेल्या निकालाच्या दस्तऐवजांच्या नकला देण्याच्या मोबदल्यात शासकीय फि व्यतिरीक्त तक्रारदार यांचेकडे अव्वल कारकुन मुक्तार फकीरा तडवी यांनी पंचासमक्ष स्वतःसाठी 500/- रुपये लाचेची मागणी केली व सदर लाचेची रक्कम स्वतः पंचासमक्ष तहसिल कार्यालय, यावल येथे स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभाग, नाशिक परिक्षेत्र पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधिक्षक एन.एस.न्याहळदे, वाचक पोलीस उपअधिक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरिक्षक संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ आदिंच्या पथकाने केली.