लोकप्रवाह, चोपडा दि. १५ जून – येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज प्राथमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी व आस्था निर्माण व्हावी यासाठी प्रथम दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी, दर्जेदार तसेच उत्सुकतेने होणेसाठी शाळा प्रवेशद्वारावर ढोलताशांच्या गजरात गुलाब पुष्प व पेन्सिल वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आल्या. शाळेतील वातावरण चैतन्यमय आणि उत्साहवर्धक होते. रांगोळी , फुले , फुगे व पताकांनी शाळेची सजावट करण्यात आली होती. प्रथमदिनी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार अंतर्गत खिचडी समवेत गोड शिरा मिष्टान म्हणून देण्यात आले.
मागील दोन वर्षात विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित नसल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या किमान पातळीपर्यंत आणण्याकरीता शाळा -पालक – शिक्षक यांनी विचार करून अध्ययन निष्पत्तीसाठी उपाययोजना, सेतू अभ्यासक्रम, इतर विविध उपक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत उपस्थित पालकांना मुख्याध्यापक एम.व्हि.पाटील यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.व्ही.पाटील, निवृत्त मुख्याध्यापक संजय पंडीत गुरव, तांदळवाडी येथील प्रगतीशील शेतकरी धनराज पोपट पाटील यासह इतर पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चंद्रकांत जाधव, अनिल पाटील, दिलीप जैस्वाल, गायत्री शिंदे , आर डी पाटील, मनोज अहिरे, प्रशांत पाटील, महेश गुजर, जयश्री पाटील, प्रियंका पाटील, नितीन वाल्हे, गोपाल पाटील, गणेश राजपूत आदींनी परिश्रम घेतले.
Post Views: 370