Father’s Day 2022 : वडील हे कुटुंबातील असे सदस्य आहेत ज्यांचे मुलांची जडणघडण व संगोपनातील योगदानाकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. आपल्या कुटुंबाला निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी हि व्यक्ती रात्रंदिवस राबराब राबत असते. याला जबाबदारीचे नाव दिले जाते. वडिलांच्या मेहनतीचे कौतुक आणि सन्मान करण्यासाठी फादर्स डे साजरा केला जातो. हा विशेष दिवस दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यावर्षी फादर्स डे 19 जून रोजी साजरा केला जाणार आहे.
वडिलांच्या सन्मानार्थ हा दिवस जगभरात विविध तारखांना आयोजित केला जातो. युरोपमध्ये हा दिवस 19 मार्च रोजी सेंट जोसेफ डे म्हणून साजरा केला जातो, तर युनायटेड स्टेट्समध्ये तो जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. ऑस्ट्रेलिया, सामोआ आणि एस्टोनियामध्ये हा राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केला जातो. तर दक्षिण कोरियामध्ये तो पालक दिन म्हणून साजरा केला जातो.
फादर्स डे इतिहास –
सोनोरा स्मार्ट डॉस नावाच्या महिलेने हा दिवस साजरा केला. डॉससह 5 भावंडांचे पालनपोषण एकट्या वडिलांनी केले. तिला पुरुष पालकांसाठी मदर्स डेसारखा दिवस बनवायचा होता. 19 जून, 1910 रोजी, वॉशिंग्टन राज्याने हा दिवस फादर्स डे म्हणून घोषित केला. तथापि, केवळ 1 मे, 1972 रोजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी फादर्स डेला राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित केले. पहिला अधिकृत फादर्स डे 18 जून 1972 रोजी साजरा करण्यात आला.
फादर्स डे महत्व –
पितृत्वाचा सन्मान करत, या दिवशी मुले त्यांच्या वडिलांच्या प्रयत्नांची आणि कुटुंबातील योगदानाची कबुली देतात. त्यांच्या वडिलांना विशेष वाटावे म्हणून ते त्यांना भेटवस्तू, अभिनंदन कार्ड इत्यादी देतात. मुले आपल्या वडिलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात.
जो “बाप” आयुष्यभर राब -राब राबतो आणि मुलांना घडवलो त्यांना मानाचा मुजरा
– संपादक –