लोकप्रवाह, चोपडा दि. २१ जून – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे योगा दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून योगा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्षा आशा पाटील, सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील उपस्थित होत्या.
योगा दिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी ऐरोबिक्सचे शानदार प्रदर्शन सादर केले. जिनिषा संदेश क्षीरसागर, हर्षदा प्रवीण बोरसे आणि मितिक्षा अग्रवाल या विद्यार्थिनींनी योगा दिनाचे महत्त्व सांगितले. इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी टेक्नॉलॉजिकल योगावर नाटिका सादर केली. नृत्याच्या माध्यमातून इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी विविध आसनांचे सादरीकरण केले. इयत्ता सातवीचे विद्यार्थी हार्दिक दीपक चौधरी, दिव्यतेज अतुल पाटील यांनी विविध आसनांचे प्रात्यक्षिके सादर केली.
सर्व विद्यार्थ्यांसोबत महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. स्मिता पाटील आणि मुख्याध्यापिका ममता न्याती यांनी देखील प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग नोंदवला
सदर कार्यक्रमाचे आयोजन क्रिडा शिक्षक पूजा गुलाब चौधरी व प्रवीण भास्कर पाटील यांनी केले. यावेळी कलाशिक्षक शकील अहमद शेख यांनी सुरेख फलक रेखाटन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी खंडेराव पाटील, इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी पूर्वी पवन अग्रवाल व लूईझा तनवीर शेख यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदिंनी परिश्रम घेतले.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...