लोकप्रवाह, चोपडा दि. २१ : आज दि २१ जून रोजी ८ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरातील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात योग दिन उत्साहात संपन्न झाला. शरीर, मन व आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी योग महत्त्वाचा आहे. भारतीय संस्कृती व परंपरेचा अविभाज्य भाग म्हणून याकडे पाहिले जाते.
आज जगभर जागतिक योग दिवस साजरा होत असताना शहरातील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात क्रिडा शिक्षक व्ही.पी.कोष्टी यांनी विविध प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना विविध योगासनांबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी ताडासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, शशांकासन, वक्रासन, भुजंगासन, शलभासन, मक्रासन, सेतुबंधासन, शवासन, कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी व ध्यान आदी योगासनांचा समावेश होता. मानव जातीच्या कल्याणासाठी ॠषीमुनींनी प्राणायमांचा आविष्कार केला. ताण तणांवाचे प्राणायमाच्या माध्यमातून व्यवस्थापण करता येते.
ध्यान – धारणेतून मनुष्य जीवनाचे रहस्य व उद्देश जाणून घेता येते
मुख्याध्यापक एच. बी.मोरे
सुरुवातीला शहरातील स्वस्तिक टॉकीज, थाळनेर दरवाजा, तहसील कचेरी, मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रभातफेरी द्वारे जनजागरण जागृती करण्यात आली. तसेच स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव अंतर्गत वक्तृत्व, कला व निंबध स्पर्धा घेण्यात आल्यात.यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदिंची उपस्थिती होती.
Post Views: 117