टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०६ – येथील भगीनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयात रोटरॅक्ट क्लब ऑफ चोपडा व एमएसडब्ल्यू द्वितीय वर्षाचे विद्यार्थी यांच्या वतीने शिक्षक दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन व क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. तदनंतर विद्यार्थीनी कु. कल्याणी महाजन हिने स्वागतगीत सादर केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर, उपप्राचार्य डाॅ. आशिष गुजराथी, डाॅ. अनंत देशमुख, डाॅ. विष्णू गुंजाळ, प्रा. नारसिंग वळवी, डाॅ. विनोद रायपुरे, डाॅ. राहूल निकम, डाॅ. मारोती गायकवाड, डाॅ. उत्तम सोनकांबळे, डाॅ. संबोधी देशपांडे, ग्रंथपाल प्रा. कल्पना सोनवणे, सहाय्यक ग्रंथपाल प्रा. रूपाली देसाई यांच्यासह एकता अग्रवाल, भाग्यश्री महाजन, सेजल शहा, सौ. खैरणार आदी गुरुजण उपस्थित होते. उपरोक्त शिक्षकवृंदांना विद्यार्थ्यांनी शुभेच्छापत्रे व गुलाबपुष्प देवून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्यावतीने प्रातिनिधिक स्वरूपात डिगंबर धनगर व उज्वला वाघ यांनी मनोगत व्यक्त करून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर, उपप्राचार्य डाॅ. आशिष गुजराथी, प्रा. डाॅ. विष्णू गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी अनिल बाविस्कर, अरुण भोई, डिगंबर धनगर, अजय शिरसाठ, राहूल कोळी, रोहित रायसिंग, अजित भिल, तय्यब तडवी, महेंद्र गावित, लोकेश गवळी, वैभव चव्हाण, विद्यार्थीनी अनिता पाटील, उज्वला वाघ, नेहा देशमुख, दिपाली रामोशी, शकुंतला पावरा, राजनंदीनी वाघ, अनिता भिल, मिनाक्षी साळुंखे, कल्याणी महाजन यांनी केले होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरूण भोई यांनी केले तर अनिल बाविस्कर यांनी आभार मानले.