टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १३ ऑक्टो.– येथील भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र, वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने चोपडा तालुक्यातील देवझिरी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न झाले. समाजकार्य महाविद्यालयातील बीएसडब्ल्यू तृतीय वर्ष व एमएसडब्ल्यू द्वितीय वर्ष क्षेत्रकार्याच्या वैजापूर व मुळ्यावतार गटाचे क्षेत्रकार्य पर्यवेक्षक डॉ. प्रा. आशिष गुजराथी व प्रा. नारसिंग वळवी यांच्या लक्षात आले की आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते त्यामुळे त्यांनी सदर शिबिराचे आयोजन केले.
शिबिराप्रसंगी उपस्थित प्रा. डॉ. आशिष गुजराथी, प्रा. नारसिंग वळवी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. राजेंद्र रनाळकर, महालॅब तंत्रज्ञ प्रमोद ठाकरे व विद्यार्थी वर्ग
सदर शिबिरासाठी वैजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा अधिकारी राजेंद्र रनाळकर व महालॅब तंत्रज्ञ प्रमोद ठाकरे यांनी बहुमोल असे सहकार्य केले. सदर शिबिराच्या आयोजनाचे नियोजन क्षेत्रकार्य पर्यवेक्षक डॉ. प्रा. आशिष गुजराथी व प्रा. नारसिंग वळवी यांनी केले. यावेळी राजेंद्र रनाळकर यांनी विद्यार्थ्यांना रक्तातील हिमोग्लोबिनच्या प्रमाणाचे महत्त्व काय ? व ते किती असावे?, ते संतुलित ठेवण्यासाठी आपण कोणता आहार घेतला पाहिजे ?, कोणती काळजी घेतली पाहिजे ? याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये ४५ मुले व ४० मुलींचे हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.
सदर शिबिरासाठी आश्रम शाळेतील शिक्षक एस. एम. सुरवाडे, सी. जी. बारेला, ए. आर. पावरा, आर. बी. बारेला, एम. झेड. बारेला, सी. जी. बारेला व शिपाई के. के. पावरा यांनी विशेष सहकार्य केले. तसेच वैजापूर क्षेत्र कार्य गटातील विद्यार्थी दुर्गेश पावरा, हिमानी पाटील, विशाल भालेराव, वैष्णवी धनगर, संदीप पावरा व मुळ्यावतार क्षेत्र कार्य गटातील अजित भिल, दिपाली रामोशी, नेहा देशमुख, लोकेश गवळी, अरुण भोई, अश्विनी धनगर या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. शिबिराची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी वैजापूर गावातील आशा वर्कर व ग्रामस्थांना मागील क्षेत्र कार्यात नोंदणी केलेल्या आभा कार्डचे वितरण केले.
टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 03 - शहरातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना सुरक्षित, सुलभ आणि प्रेरणादायी मतदानाचा अनुभव देण्यासाठी चोपडा...