Tuesday, August 4, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

आयुष्यमान भव: योजनेत जळगाव राज्यात अग्रेसर ठरेल – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विश्वास

आयुष्मान कार्डाचे घरोघरी वाटप करा; 'आयुष्यमान भव' मोहिमेचा पालकमंत्र्यांचे हस्ते शुभारंभ

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
September 20, 2023
in जळगांळ जिल्हा, आरोग्य, शासकीय
0
आयुष्यमान भव: योजनेत जळगाव राज्यात अग्रेसर ठरेल – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विश्वास
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, जळगाव, दि.१७ सप्टेंबर (जिमाका) : जळगाव जिल्हा विविध योजना व उपक्रमांच्या अंमलबजावणीत कायम अग्रेसर राहिला आहे. ‘आयुष्यमान भव:’ या योजनेत ही जिल्ह्याचे काम राज्यात अग्रेसर ठरेल, असा विश्वास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देणारे ‘आयुष्यमान कार्ड’ चे घरोघरी वितरण करण्याचे काम प्रशासनाने करावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले. ‘आयुष्मान भव:’ अभियानांचा जळगाव जिल्ह्याचा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशासेविका, नागरिक यांच्यांशी फेसबुक लाईव्हद्वारे थेट संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आदी यावेळी उपस्थित होते.

आयुष्यमान भवः योजनेचा शुभारंभ करतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील सोबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे जिल्ह्यात चांगले काम होत आहे. उर्वरित नागरिकांनाही या दोन्ही योजनेची ओळखपत्रे काढून द्या. वैद्यकीय सेवा आणि औषधोपचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा. आपली जबाबदारी मानून गोरगरिबांची सेवा प्रामाणिकपणे करा, असेही त्यांनी सांगितले. आयुष्यमान भव: ‘एक देशव्यापी अभियान आहे. प्रत्येक गाव आणि शहरात आरोग्य सेवा प्रदान करणे. हा या अभियानाचा उद्देश असून या माध्यमातून स्वच्छता अभियान, आयुष्यमान सभा, अवयव दान मोहीम, रक्तदान शिबिर, अंगणवाडी मधील मुलांची तपासणी यासारखे उपक्रम राबवून जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या प्रकारचे आरोग्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे. जिल्ह्यातील प्रत्येकाने सहभागी होऊन ‘आयुष्यमान भव:’ ही मोहीम लोक चळवळ म्हणून उभी करावी. शंभर टक्के ही मोहीम यशस्वी करावी. असा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.‌ राज्यात आजपासून १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान ‘आयुष्मान भव’ मोहीम राबवली जाणार आहे. असे नमूद जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, आयुष्यमान कार्डसाठी आपल्या जिल्ह्याचे उद्दिष्ट १४ लक्ष ६८ हजार ६२५ आहे. त्यापैकी चार लक्ष ९१ हजार ६७४ कार्ड वितरित करण्यात आलेले आहेत. उर्वरित कार्डधारकांना या मोहिमे दरम्यान आयुष्यमान कार्ड काढून देण्यासाठी सर्व आशा स्वयंसेविका कर्मचाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करत स्वच्छता अभियान, आयुष्यमान मेळावा, रक्तदान मोहीम, अवयवदान मोहीम, आयुष्यमान सभा, “आयुष्यमान आपल्या दारी ” अंगणवाडी, प्राथमिक शाळांमध्ये मुलांची तपासणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून सदर अभियान यशस्वीपणे राबवण्याचे आवाहन त्यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित म्हणाले. ‘आयुष्मान भव:’ ही केंद्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. ३१ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेमध्ये आयुष्मान आपल्या दारी , आयुष्मान मेळावा, आयुष्यमान सभा, अंगणवाडी व शाळेतील मुलांची तपासणी या योजनाच समावेश आहे. आयुष्मान मेळाव्यात रक्तदान व शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित केले जाणार आहेत. आयुष्मान सभा अंतर्गत २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने गाव पातळीवर आयुष्मान सभांचे आयोजन केल्या जाणार असून सर्व आजाराची माहिती देणे तसेच आयुष्मान बाबत जनजागृती करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

Post Views: 756
Previous Post

आदिवासी आश्रमशाळा शिक्षकांचा क्षमता चाचणी परीक्षेवर बहिष्कार!

Next Post

 देवझिरी शासकीय आश्रमशाळेत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न

Next Post
 देवझिरी शासकीय आश्रमशाळेत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न

 देवझिरी शासकीय आश्रमशाळेत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोपड्यात भक्तीमय सप्ताहाचे आयोजन

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज...

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

डायल ११२ वर आत्महत्येचा खोटा कॉल; पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

by टीम लोकप्रवाह
August 3, 2026
0

चोपडा : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर आत्महत्येबाबत खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार चोपडा...

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us