या शिबीरांतर्गत आरोग्यसेविका शेवंता बारेला व लॅब असिस्टंट अमित पावरा यांनी रक्ताचे नमुने घेऊन ४५ किशोरवयीन मुलींचे हिमोग्लोबीन तपासणी केले व सर्व युवतींना हिमोग्लोबीन दर्शक कार्डचे वाटप देखील यावेळी करण्यात आले. त्यानंतर प्रमूख वक्त्या हर्षदा सुशीर यांनी मुलींना सांगितले की, मानवी शरीरात रक्तातील लाल पेशींमध्ये हिमोग्लोबिन असते. हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असते, हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजे रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होणे, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि आजारपण येण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असण्यासाठी संतुलित आहार गरजेचा आहे असे मार्गदर्शन केले.
यावेळी MSW प्रथम वर्षाचे विद्यार्थी जगदीश कापुरे यांच्यावतीने सर्व युवतींना पोषक आहार म्हणून बिस्किट्स वाटप करण्यात आले. शिबीर यशस्वितेसाठी क्षेत्रकार्य पर्यवेक्षक डाॅ. अनंत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी अनिल बाविस्कर, जगदीश कापुरे, डिगंबर धनगर, वृषाली शिरोळे, वैभव चव्हाण, महेंद्र गावित, रोहित शिंदे, नितीन जोशी, हर्षदा पटले, वृषाली बागले, अमिशा पाडवी, प्रियंका वळवी, सोनिया वसावे, हिमांशू बारी, समीर तडवी, अंजली बारेला व निकीता पावरा आदींनी परीश्रम घेतले.