मुंबई : इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटनांनंतर आता इलेक्ट्रिक कारला आग लागली आहे. भारतातील सर्वाधिक विकले जाणारे इलेक्ट्रिक वाहन Tata Nexon EV ने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे.
@TeslaClubIN @RNTata2000 @Tatamotorsev @nitin_gadkari
Need statement on this incident. Nexon ev caught fire in Mumbai pic.twitter.com/NxrZ99mkr9— Straddle Trader (@amtrade141) June 23, 2022
या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाची टाटा नेक्सॉन ईव्ही आगीत जळताना दिसत आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. यात कोणतीही इजा किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
टाटा मोटर्सने या घटनेबाबत आधीच एक निवेदन जारी केले आहे. त्यानुसार, “सोशल मीडियावर नुकत्याच घडलेल्या वेगळ्या थर्मल घटनेची सत्यता पडताळून पाहण्यासाठी सध्या सविस्तर तपास केला जात आहे. आम्ही आमच्या पूर्ण तपासणीनंतर तपशीलवार प्रतिसाद शेयर करू. आम्ही आमच्या वाहनांच्या आणि त्यांच्या वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहोत. जवळपास 4 वर्षात देशभरात 30,000 हून अधिक ईव्हीने एकत्रितपणे 100 दशलक्ष किमी पेक्षा जास्त अंतर कापल्यानंतर ही पहिलीच घटना आहे.
सोशल मीडिया पोस्टनुसार, ही घटना मुंबईजवळील वसईमध्ये घडली आहे. इतर वापरकर्त्यांनी देखील सोशल मीडियावर या घटनेवर निवेदनाची मागणी केली.
@TataMotors @TataMotors_Cars @TeamBHPforum @NexonEVOwnerClb A nexon ev caught fire in vasai near mumbai. pic.twitter.com/CEQFQosxDg
— Ketan (@K10711988) June 22, 2022