टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०१ – अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सर्वंकष मूल्यमापन यावर आधारीत जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, जळगाव तसेच गट साधन केंद्र, पंचायत समिती, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत प्रशिक्षण वर्गाचा दिनांक २९ जानेवारी २०२४ ते ०२ फेब्रुवारी २०२४ दरम्यान अंतिम टप्पा सुरु आहे. यादरम्यान विविध तज्ञ मार्गदर्शकांनी आजच्या शैक्षणिक परिस्थिवर आपले मत व त्यावरील उपाययोजनांवर भाष्य केले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी अविशान पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सद्यपरिस्थिती बघता नवीन शैक्षणिक धोरण आले असून हे बदल स्वीकारण्याची काळाजी गरज निर्माण झाली असल्याचे मतही यावेळी मांडण्यात आले. आजचे मुलं उद्याचे भविष्य घडवतील त्यामुळे मुलांच्या कौशल्यगुणांना वाव द्या. त्यांना प्रेरणा द्यावी जेणेकरुन मुले स्वतः आपले भविष्य घडवणयासाठी सक्षम बनतील. सर्वांनी हे बदल सजग हून स्वीकारण्याची आता गरज असल्याची भावना यावेळी उपस्थित तज्ञ मार्गदर्शकांनी बोलून दाखवली. अनेक समाजसेवी संस्थांचे शिक्षणा संदर्भातील अहवाल व त्यावरील तज्ञांचे मत तसेच प्रशासन करीत असलेले उपायोजना यावर देखील विस्तृत चर्चा यावेळी करण्यात आली.
सदर प्रशिक्षणाला तज्ञ मार्गदर्शक म्हणून देवेंद्र पाटील, अजीत पाटील, मोनेश बाविस्कर, मिलिंद पाटील, सुनील मेश्राम, रविराज शिंदे, जीवनलाल वडिले, प्रशांत सोनवणे, आधार पानपाटील, समाधान पाटील, मनीषा पाटील यांनी कामकाज सांभाळले. त्यावेळी उदय वानखेडे, जगदीश महाजन, जितेंद्र पाटील, विनोद पाटील, दौलत पावरा, सुनिल कन्हैये , विकास पाटील, प्रकाश महाजन, कैलास महाजन, योगेश पाटील यांनी उपक्रम घेऊन गटचर्चा वर्गातील अध्यापनाचे नियोजन सांगितले.
Post Views: 201