टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०१ – तालुक्यातील देवगांव पारगांव येथे कार्यरत आलोसे ग्रामसेवकाने तक्रारदार ग्रामस्थ यांना शेतात वेअर हाऊस बांधकामाची परवानगी दिली व मोबदल्यात बक्षिस म्हणून तक्रारदार यांचेकडे 7500 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. व दिनांक 31/01/2024 रोजी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता आलोसे ग्रामसेवक यांनी तडजोडीअंती त्यांना पाच हजार रुपयाची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. त्यांचेवर अडावड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांचे पारगाव गावी येथे शेत असून त्यामध्ये वेअरहाऊस बांधण्याकरता ग्रामपंचायतची परवानगी मिळावी म्हणून तक्रारदार यांनी सुमारे दीड महिन्यापूर्वी अर्ज केला होता. त्याप्रमाणे यातील आलोसे ग्रामसेवक हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे , वय 39 वर्ष व्यवसाय – नोकरी, ग्रामसेवक देवगांव, पारगांव रा. चोपडा ता. चोपडा जि.जळगांव यांनी तक्रारदार यांना वेअर हाऊस बांधकामाची परवानगी दिली व केलेल्या कामाचा मोबदला /बक्षीस म्हणून तक्रारदार यांचे कडे 7500 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. व दिनांक 31/01/2024 रोजी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता आलोसे यांनी तडजोडीअंती त्यांना पाच हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचेवर अडावड पोलीस स्टेशन ता. चोपडा जि. जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधिक्षक माधव रेड्डी, व वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार आदिंच्या मार्गदर्शनाखाली व जळगांव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सफौ. दिनेशसिंग पाटील, पोना. बाळू मराठे, पोकाँ. राकेश दुसाने आदिच्या पथकाने केली. यामध्ये पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, स.फौ. सुरेश पाटील, पोहेकाँ. रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पोना. किशोर महाजन, सुनिल वानखेडे, पोकॉ. प्रदीप पोळ, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी आदिंच्या पथकाने कारवाईकामी मदत केली.