टिम लोकप्रवाह, चोपडा दि. १० – आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने निवडणुक निर्णय 04 रावेर लोकसभा मतदारसंघ अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी, जळगांव यांच्या अध्यक्षतेखाली 10 – चोपडा लोकसभा मतदार संघातील सर्व विभागप्रमुख तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी व लोकसभा निवडणुक कामी नेमणुक केलेल्या सर्व नोडल अधिकारी व सहाय्यक नोडल अधिकारी यांची दिनांक 07 मार्च 2024 रोजी प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय, चोपडा येथे आढावा बैठक संपन्न झाली.
प्रस्तुत आढावा बैठकीमध्ये चोपडा तहसिलदार यांनी प्रथम चोपडा मतदार संघाची प्राथमीक माहीती चे वाचन केले. अप्पर जिल्हाधिकारी यांनी लवकरच लोकसभा निवडणुकीची आचारसंहीता लागण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी लोकसभा निवडणुक संदर्भातील सर्व अनुषंगिक कामकाजाची तयारी आतापासुनच पूर्ण करुन ठेवण्याबाबत निर्देश दिले आहे. तसेच
1. क्षेत्रीय अधिका-यांनी आपल्या विभागातील मतदान केंद्रासाठी किमान मुलभुत सुविधांचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना पूर्ण करुन घ्याव्यात.
2. सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी मतदार केंद्राची तपासणी पूर्ण करुन अपूर्ण कामे प्रथम प्राधान्यतेने पूर्ण करण्याबाबत सुचना देण्यात आल्या.
3. सर्व विभाग प्रमुख व नोडल अधिकारी यांनी सोपविण्यात आलेल्या विषयाबाबत माहिती पुस्तीकेचे
वाचन करण्यात यावे. तसे सखोल नियोजन करण्यात यावे.
4. EVM ची संपूर्ण माहीती घेवून जास्तीत जास्त EVM मशिन हाताळून सखोल ज्ञान प्राप्त करुन घ्यावे.
5. निवडणूक कामी सर्व कर्मचारी यांचे प्रशिक्षणाचे नियोजन करावे. ठिकाण, वेळ याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी.
6. मतदान केंद्र दुरुस्ती प्रस्ताव मंजूर असुन सर्व कामे वेळेत पूर्ण होतील याबाबत गटविकास अधिकारी व संबंधित उपअभियंता (सा.बां.) यांनी दक्षता घ्यावी.
तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी सर्वप्रथम निवडणुक आयोगाच्या नियमपुस्तिकेनुसार आपआपले काम समजवुन घेवुन कामकाज करण्याबाबत सुचना दिल्या.
सदर बैठकीस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पुनर्वसन गजेंद्र पाटोळे, अर्पित चव्हाण भा.प्र.से. परिविक्षाधिन मुख्यधिकारी नगरपरिषद चोपडा, चोपडा तालुक्याचे तहसिलदार भाऊसाहेब थोरात, गट विकास अधिकारी रमेश वाघ, पोलिस निरीक्षक मधूकर साळवे व निवडणुक नायब तहसिलदार सचिन बांबळे तसेच सर्व विभाग प्रमुख, नोडल अधिकारी सहाय्यक नोडल अधिकारी इ. कर्मचारी उपस्थित होते.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...