टिम लोकप्रवाह, वर्धा दि. १० – जागतिक महिला दिनानिमित्त संस्कार नॅशनल स्कूल, नाट्यप्रतीक थिएटर अकॅडमी व जगदीश श्रीराम पोद्दार फाउंडेशन, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने “ती” (प्रत्येक भूमिकेतील “ती” चा करा सन्मान) हा कार्यक्रम, मंगळवार दिनांक . १२ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता साई मंदिर, वर्धा येथे आयोजित करण्यात आलेला आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री स्मिता रवींद्र कोल्हे, दत्ता मेघे ग्रुप, सावंगीच्या प्रशासकीय प्रमुख पूजा उज्वल व्यास, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ज्ञानदा फणसे, अजितदादा सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र च्या महिला अध्यक्ष माया अचुतराव शिरसाट आदिंची उपस्थिती राहणार आहे.
सदर कार्यक्रमात २० विभिन्न क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात येणार असून नारी प्रत्येक भूमिकेत उत्कृष्ट कामगिरी पार पाडू शकते याचे जिवंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट होतील. नारीशक्ती सन्मानासाठी कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्कार नॅशनल स्कूलचे संचालक अनुराग पोदार आणि नाट्यप्रतिक थिएटर अकॅडमीचे संचालक प्रतीक सूर्यवंशी यांनी केले आहे.