टिम लोकप्रवाह, जळगांव दि. 13 – येथील एमआयडीसी पोलीस स्थानक प्रभारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बबन आव्हाड यांनी याअगोदर जिल्हापेठ जळगांव, बाजारपेठ पोलीस स्टेशन भुसावळ व जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन या ठिकाणी सेवा बजावली आहे.
सदर नियुक्ती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशान्वये बुधवारी दिनांक १२ रोजी झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. व आज गुरुवारी १३ जून रोजी बबन आव्हाड हे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा पदभार स्वीकारणार आहेत.