टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 5 – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेच्या संघाची क्रिकेट या खेळात 17 वर्षाखालील गटांमध्ये बाजी मारत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावित जिल्हास्तरीय सामन्यासाठी निवड झाली आहे. या उत्कृष्ट अशा कामगिरीबद्दल त्यांचे महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डाॅ. स्मिता पाटील शाळा समन्वयक एन. एस. सोनवणे, डाॕ. डी. एस. पाटील, अशोक साळुंखे, विलास दारूंटे, डी. जी. सोमानी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, अश्विनी पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन व कौतुक केले.
दिनांक 1 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धा पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल या शाळेच्या मैदानावर क्रिकेटचा अंतिम सामना हा पकंज माध्यमिक विद्यालय आणि ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल या दोन संघांमध्ये झाला. सदर सामना ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेच्या संघाने जिंकत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला.
या संघामध्ये आदित्य संजीव बेहेरे, कौस्तुभ रमेश चौधरी, दिवेश उमेश खाचणे, पारस अभय जैन, पियुष धनराज पाटील, यश भरत महाजन,राज दिनेश सोनवणे, चंदन अनिल महाले,शतायू प्राजक्ता सोनवणे, श्लोक तुकाराम पाटील, सर्वेश मच्छिन्द्र सैदाणे, सिद्दम दीपक जैन, हर्षल शेखर पाटील, हार्दिक दीपक चौधरी, हितेश अनिल पाटील, हिमांशू प्रवीण बोरसे या विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यांना क्रीडाशिक्षक अमोल पाटील, भुषण गुजर व विशाल मराठे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डाॅ. स्मिता पाटील, शाळा समन्वयक एन. एस. सोनवणे, डाॕ. डी. एस. पाटील, अशोक साळुंखे, विलास दारूंटे, डी. जी. सोमानी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, अश्विनी पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.