टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 6 – येथील भगिनी मंडळ संचलित ललित कला केंद्रात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला विद्यार्थी प्राचार्य कल्याणी पाटील, विद्यार्थी शिक्षक राजनंदिनी पाटील, लिपिक अनुज बडगुजर व विद्यार्थी सेवक पार्थ पाटील यांनी संपूर्ण महाविद्यालयाची धुरा सांभाळून प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर मंडळींना पूर्णपणे आराम दिला.
वर्ग सुरू होताच प्रत्येकाने आपापली जबाबदारी चोख पार पाडली. दुपारी बारा वाजता या दिनाचे औचित्य साधून दिनविशेष महत्त्व लक्षात घेऊन “स्पंदन” या भित्तिपत्रकाचे अनावरण करण्यात आले. या पत्रकात सर्व विद्यार्थ्यांनी आपापले शिक्षणाविषयी स्वविचार प्रगट केले व स्वतःच्या सुंदर हस्तक्षरात नाविन्यपूर्वक सजावटीने ते नटविले.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा पूनम गुजराथी यांच्या उपस्थितीत महिला मंडळ व्हॅलेंटरी स्कूलचे ज्येष्ठ शिक्षक मयूर बारेला यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तर देवांशी पित्रुडा, पार्थ महाजन, मयुरी पाटील, कल्पेश सूर्यवंशी, सिद्धेश पाटील व देवांश कोळी यांनी मेहनत घेणाऱ्या या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी कल्याणी पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर प्राचार्य सुनील बारी यांनी आभार प्रदर्शन केले.