लोकप्रवाह, चोपडा दि. ०६ जुलै – येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र गंगाधर पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था संचलित कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतीगृहात विविध साहित्याचे वाटप तसेच आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर जाणारे वारकरी यांना चोपडा आगार येथे औषधींचे वाटप करण्यात आले.
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था संचलित कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतीगृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत आदिवासी विद्यार्थ्यींनींना मदत व्हावी या विशाल दृष्टिकोनातून टुथपेस्ट, टूथब्रश, खोबरेल तेल, आंघोळीची साबण, कपडे धुण्याचे साबण, पावडर व बिस्किटे आदि साहित्याचे वाटप केले.
आदिवासी विद्यार्थ्यांना मदतीसाठी समाजातील दातृत्वशाली व्यक्तींनी पुढे येण्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादीचे सेवादल तालूका अध्यक्ष डॉ.विजय पाटील, युवक शहराध्यक्ष समाधान माळी, कार्याध्यक्ष शरद देशमुख, राजेंद्र धनगर, सुरेश पारधी, संजय कोळी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष महेश शिरसाठ, कमला नेहरु मागासवर्गीय मुलींचे वस्तीगृह अधिक्षिका कावेरी कोळी आदिंची उपस्थिती होती.
पंढरपूर जाणाऱ्या भक्तांना मेडीकल किटचे वाटप
पंढरपुर येथे आषाढी एकादशीनिमित्त यात्रेला जाणाऱ्या भाविक भक्तांना राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या तर्फे औषधी व फराळाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पंढरपूर जाणाऱ्या बसचे चालक, वाहक व प्रवासी यांचा टोपी रुमाल, शाल व श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, युवक शहराध्यक्ष समाधान माळी, सेवादल अध्यक्ष डाॅ. विजय पाटील, कार्याध्यक्ष शरद देशमुख, राजेंद्र धनगर, आगार व्यवस्थापक क्षिरसागर आदिंची उपस्थिती होती.
Post Views: 182