लोकप्रवाह, चोपडा दि. ०७ जुलै – चोपडा तहसील कार्यालय येथे आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत प्रति लाभार्थी रक्कम रुपये २०,००० मात्र चे धनादेश वाटप करण्यात आले. एकूण ३५ लाभार्थ्यांना रुपये ७ लाख इतक्या रक्कमेचे धनादेश वाटप करण्यात आले.
तसेच आमदार लताताई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय संजय गांधी योजना समितीची बैठक घेण्यात आली.
यामध्ये श्रावण बाळ योजना ५५ , इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना ८१, इंदिरा गांधी विधवा योजना ७५, इंदिरा गांधी अपंग योजना ०४ असे एकूण २१५ अर्ज या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आले.
तर सर्व योजनेमधील उर्वरीत २४४ अर्ज हे नामंजूर करण्यात आले. याप्रमाणे एकूण ४५९ अर्जांवर या बैठकीमध्ये कार्यवाही करण्यात आली.
यावेळी बैठकीत तहसीलदार अनिल गावीत, समिती सदस्य संतोष भिवसन अहीरे, मंगला कैलास पाटील, राजेंद्र हिलाल पाटील, गोपाल अंबादास चौधरी, रोहिणी प्रकाश पाटील, संजीव पांडूरंग शिरसाठ, रामचंद्र नारायण देशमुख, आत्माराम कौतिक गंभीर, माणिकचंद रुपचंद महाजन व गटविकास अधिकारी हे उपस्थित होते. सदर बैठकीचे कामकाज अव्वल कारकुन वाय.एच. न्हाळदे, महसूल सहाय्यक एम.बी. दरी व आयटी सहाय्यक समाधान कोळी यांनी पुर्ण केले.
टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 03 - शहरातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना सुरक्षित, सुलभ आणि प्रेरणादायी मतदानाचा अनुभव देण्यासाठी चोपडा...