चोपडा दि. 29 – सद्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी सुरु आहे. चोपडा विधानसभा मतदारसंघात काल दिनांक 28 ऑक्टोबर पर्यंत एकूण 38 उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी तब्ब्ल 87 नामनिर्देशन पत्र घेतलेले आहेत.
त्यामध्ये 28 ऑक्टोबर रोजी आठ उमेदवारांनी 21 अर्ज घेतलेले आहेत. असे असले तरी अजून पर्यंत फक्त तीनच उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र भरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहेत. बाळू साहेबराव कोळी आणि हिरालाल सुरेश कोळी यांनी अपक्ष तर सुनील तुकाराम भिल यांनी भारत आदिवासी पार्टी या पक्षाच्या वतीने आपले नामनिर्देशन पत्र भरले आहेत.