लोकप्रवाह, चोपडा दि. ०८ जुलै – आषाढी एकादशी व बकरी ईद या सणांच्या अनुषंगाने ३२ जणांवर प्रतिबंधात्मक कार्यवाई करीत हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली असल्याचे चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत सांगितले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा शहर पोलीस स्टेशन कडून आगामी आषाढी एकादशी व बकरी ईद हे उत्सव शांततेत पार पडणेकामी योग्य ती प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे. सदर सण व उत्सवाच्या अनुषंगाने संबंधीत गुरे वाहतुक व विक्री करणारे किंवा त्या संबंधीत दाखल गुन्ह्यातील मागील पाच वर्षावरील आरोपीतांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून एकूण ३२ आरोपीतांविरुद्ध उपविभागीय अधिकारी, अमळनेर भाग यांच्या कडे सी.आ.पी.सी. कलम १४४ (२) अन्वये प्रस्ताव पाठविण्यात आले होते. सदर सर्व प्रस्ताव मंजूर झाले असून संबंधीतांना दिनांक ०८/०७/२०२२ ते १३/०७/२०२२ पर्यंत चोपडा तालुका हद्दीत प्रवेश करण्यास मनाईचा आदेश प्रांताधीकारी यांचेकडून देण्यात आला आहे. शहर पोलीसांकडून सदर आदेशाची अमंलबजावणी करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे व सहाय्यक पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
यापुढे देखील उपद्रवी लोक, समाजकंटक व कायदा – सुव्यवस्थेचे उल्लंघन करणाऱ्यांवर भविष्यात देखील कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी यावेळी सांगितले. तसेच हद्द प्रवेशासंंबंधी सदर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास आरोपीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही यावेळी सांगितले.
सदर शांतता कमिटीच्या बैठकीत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमृतराज सचदेव, मनसे माजी जिल्हाप्रमुख अनिल वानखेडे, राष्ट्रवादीचे प्रविण गुजराथी, गिरीष पाटील, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष शामसिंग परदेशी, मुक्तार सरदार, भाजप शहराध्यक्ष गजेंद्र जैस्वाल, माजी उपनगराध्यक्ष किशोर चौधरी, हुसेन पठाण, माजी नगरसेवक एहसानअली सैय्यद, नोमान काझी, अकील जहागिरदार, डॉ. रविंद्र पाटील, युवासेनेचे डॉ. रोहन पाटील, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे जमील कुरेशी आदिंसह इतरांची उपस्थिती होती.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...