Monday, August 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

राज्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर; १८ आॕगस्टला होणार मतदान !

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
July 8, 2022
in राजकीय, महाराष्ट्र
0
राज्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर; १८ आॕगस्टला होणार मतदान !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांचा आज अखेर बिगुल वाजला. राज्यातील पर्जन्यमान कमी असलेल्या 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहिर केला.

18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणूकीची प्रक्रीया 20 जुलैपासून सुरु होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 20 जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार असून लगेच 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. छाननी व वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी 29 जुलै रोजी जाहिर केली जाणार असून 4 ऑगस्ट पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे.
जेथे आवश्यकता भासेल त्या ठिकाणी 18 ऑगस्ट रोजी मतदान घेतले जाणार आहे. लगेच दुस-या दिवशी म्हणजे 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी करुन निकाल जाहिर केले जाणार आहेत. यंदा अर्ज माघारी घेणे व प्रत्यक्ष मतदान यात 14 दिवसांचा कालावधी असून प्रचारासाठी दोन आठवड्यांचा कालावधी उमेदवारांना मिळणार आहे. यंदा प्रथमच संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबचा उल्लेख निवडणूक आयोगाने केलेला असल्याने ती एक नवीन बाब ठरणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अंतिम मतदार याद्यांची निश्चिती झालेली असून त्या मतदार याद्यानुसारच आता मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. दरम्यान सत्ताबदलानंतर नगराध्यक्ष जनतेतून निवडावा अशी भाजपची भूमिका असल्याने राज्य शासन त्या बाबत काय निर्णय घेणार या बाबतही उत्सुकता आहे. मात्र आता निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहिर केल्याने नगरपालिकांच्या निवडणकांचा बिगुल वाजला आहे.

या 92 नगरपालिकांच्या होणार निवडणूका

राज्यातील कमी पर्जन्यमान असलेल्या 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहिर केला. या कार्यक्रमानुसार 20 जुलैपासून निवडणूकीची प्रक्रिया सुरु होणार असून 18 ऑगस्ट रोजी मतदान व 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.

या मध्ये समाविष्ट नगरपालिका पुढील प्रमाणे

अ वर्ग नगरपालिका– भुसावळ, बारामती, बार्शी, जालना, बीड व उस्मानाबाद

ब वर्ग नगरपालिका– मनमाड, सिन्नर, येवला, दोंडाईचा वरवाडे, शिरपूर वरवाडे, शहादा, अमळनेर, चाळीसगाव, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, चाकण, दौंड, कराड, फलटण, इस्लामपूर, विटा, अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज, जयसिंगपूर, कन्नड, पैठण, अंबेजोगाई, माजलगाव, परळी वैजनाथ, अहमदपूर, अंजनगाव सुर्जी,

क वर्ग नगरपालिका– चांदवड, नांदगाव, सटाणा, भगूर, वरणगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, पारोळा, यावल, जामखेड, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, राहता, राहुरी, राजगुरुनगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड, शिरुर, म्हसवड, रहिमतपूर, वाई, आष्टा, तासगाव, पलूस, मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी, मंगळवेढा, सांगोला, गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड, वडगाव, गंगापूर, खुलताबाद, अंबड, भोकरदन, परतूर, गेवराई, किल्लेधारुर, भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, उमरगा, परांडा, तुळजापूर, औसा, निलंगा, दर्यापूर, देउळगावराजा,

नगरपंचायती– नेवासा, मंचर, माळेगाव बुद्रुक, अनगर

Post Views: 560
Previous Post

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांचा गोळीबारात मृत्यू…!

Next Post

चोपडा शहरातील तब्बल ३२ जणांना हद्दपारीची नोटीस; शांतता कमिटी बैठकीत पोलीस निरीक्षकांनी दिली माहिती

Next Post
चोपडा शहरातील तब्बल ३२ जणांना हद्दपारीची नोटीस; शांतता कमिटी बैठकीत पोलीस निरीक्षकांनी दिली माहिती

चोपडा शहरातील तब्बल ३२ जणांना हद्दपारीची नोटीस; शांतता कमिटी बैठकीत पोलीस निरीक्षकांनी दिली माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

वडती येथे पित्याकडून दोन मुलांवर जीवघेणा हल्ला; मुलीचा मृत्यू

by टीम लोकप्रवाह
August 2, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. २  : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडती (ता. चोपडा) येथे रविवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण...

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us