टिम लोकप्रवाह, वर्धा दि.29 : जिल्ह्यामध्ये विकसित कृषि संकल्प अभियान दि.२९ मे ते १२ जून या दरम्यान राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात जागरूकता रथाचे उद्घाटन करून जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्याहस्ते बरबडी येथे करण्यात आली. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान व अधिक उत्पन्न देणारे वाण याविषयी माहिती जाणून घ्यावी. अभियानादरम्यान शास्त्रज्ञ शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधणार असून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

सदर अभियान भारतीय कृषि अनुसंधान परिषद, कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग, आत्मा, बजाज कृषि महाविद्यालय व इफ्कोच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी विकसित कृषि संकल्प अभियानाची संकल्पना वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांनी प्रास्ताविका दरम्यान सांगितली. आत्माच्या उपसंचालिका राणी गायकवाड यांनी शासनाद्वारे राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. आयसीएआर, सिरकोट, मुंबई येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विष्णू अरुडे व डॉ. शेषराव कौटकर यांनी कपाशी पिकाबद्दल मार्गदर्शन केले.

कृषिविद्या विषयतज्ञ डॉ.रुपेश झाडोदे यांनी सोयाबीन पीक पद्धती विषयी माहिती दिली. पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथील डॉ. चेतक पंचभाई यांनी जनावरांच्या लसीकरणाबाबत, डॉ.सचिन मुळे यांनी पशूंची निगा कशी राखावी या विषयी, डॉ.प्रेरणा धुमाळ यांनी महिलांना गृह उद्योग सुरू करताना आवश्यक बाबी याबद्दल मार्गदर्शन केले. या दरम्यान शेतकऱ्यांना ड्रोन फवारणी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक डॉ.सविता पवार व गजानन म्हसाळ यांनी करून दाखविले. राजेंद्र खर्चे यांनी कीड व रोग नियंत्रण याविषयी मार्गदर्शन केले.
अभियानादरम्यान वर्धा तालुक्यातील मांडवगड, येसंबा, गोजी, भानखेडा, धानोरा या गावातील शेतकऱ्यांना खरीप पीक पद्धती, माती परीक्षण, अझोला उत्पादन, जनावरांची निगा, मशरूम उत्पादन या विषयी शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच गावांमध्ये कृषी जागरूकता रथ फिरविण्यात आला. अभियान राबविण्याकरीता उपविभागीय कृषि अधिकारी वैष्णवी शिंदे, तालुका कृषी अधिकारी एस.एस.मुढे, प्राचार्य डॉ.देशमुख, डॉ किरणापुरे, गटविकास अधिकारी गोपाल दासरवार, श्री.मढावी, श्री.वाघाडे, श्री.ठावरी, कुणाल बुलकुंडे, पायल उजाडे, वैभव चौधरी, ऋतुजा कोरडे, वसीम खान तसेच गावातील सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केले.









