Wednesday, September 16, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

मसाप चोपडा शाखेचा पुण्यात गौरव; ‘उत्कृष्ट शाखा पुरस्कार’ प्रदान

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
May 29, 2025
in चोपडा, विशेष
0
मसाप चोपडा शाखेचा पुण्यात गौरव; ‘उत्कृष्ट शाखा पुरस्कार’ प्रदान

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 29 – शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषद या आद्य संस्थेच्या राज्यभर विखुरलेल्या शाखा परिषदेच्या रक्तवाहिन्या असून त्यांच्या माध्यमातून मराठी भाषेची सेवा करण्याचे कार्य परिषद करत असल्याचे सांगत चोपडा (जि. जळगाव) मसाप शाखेचा राजा फडणीस पुरस्कृत ‘महाराष्ट्र साहित्य परिषद उत्कृष्ट शाखा पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.

२७ मे रोजी पुणे येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात मसापचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते व भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम (मसाप विश्वस्त मंडळ अध्यक्ष), शिखर बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, दिलीप राज प्रकाशन चे राजीव बर्वे तसेच प्रसिद्ध लेखक ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गीताली वि. मं., परिषदेच्या कार्यवाह सुनिता राजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १२० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या पुरस्कार वितरण सोहळ्यात शाखेला फिरता करंडक व रोख रक्कम स्वरूपातील हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. चोपडा शाखेच्या वतीने शाखेचे संस्थापक अध्यक्ष कवी अशोक सोनवणे, उपाध्यक्ष प्राचार्य राजेंद्र महाजन, कार्याध्यक्ष विलास पं. पाटील, कार्यवाह संजय बारी सदस्य रमेश शिंदे, प्रभाकर महाजन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

पुरस्कार स्विकारतांना चोपडा मसापचे पदाधिकारी

या कार्यक्रमात भटक्या विमुक्तांचे जगणे आपल्या लेखणीद्वारे प्रभावीपणे मांडणारे ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांना डॉ. अंजली सोमण पुरस्कृत ‘मसाप जीवन गौरव पुरस्कारा’ने तर स्त्रीवादी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गीताली वि. मं. यांना ‘डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारा’ने तसेच साहित्य प्रेमी भगिनी मंडळाच्या डॉ. मंदा खांडगे यांना ‘मसाप स्नेहबंध पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. वैशिष्टपूर्ण शाखेचा पुरस्कार पलूस (जि. सांगली) या शाखेस व मसाप कार्यकर्ता पुरस्कार जयंत येलुलकर व श्रीकृष्ण पुरंदरे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी लक्ष्मण गायकवाड, डॉ. गीताली, डॉ. मंदा खांडगे यांनी मनोगते व्यक्त केली तर डॉ. रावसाहेब कसबे यांनी पुरस्कारार्थींचे अभिनंदन करत अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी तर सूत्रसंचालन अंजली कुलकर्णी यांनी व आभार प्रदर्शन विनोद कुलकर्णी यांनी केले. मसापचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी प्राचार्य तानसेन जगताप (चाळीसगाव) यांच्यासह महाराष्ट्रभरातील परिषदेचे कार्यकर्ते व अनेक साहित्यिक उपस्थित होते. शाखेला मिळालेल्या या पुरस्कारामुळे शाखेच्या कार्याला अधिक बळ मिळणार असून पुढील काळात विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येणार आहे.

Post Views: 628
Previous Post

चोपड्यात गांजा घेवून येणारा मोटारसायकलस्वार अटकेत

Next Post

शेतकऱ्यांनी खरीप पीक उत्पन्न वाढीकरिता शास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा – जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले

Next Post
शेतकऱ्यांनी खरीप पीक उत्पन्न वाढीकरिता शास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा – जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले

शेतकऱ्यांनी खरीप पीक उत्पन्न वाढीकरिता शास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा - जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us