जम्मू काश्मीर : अमरनाथमध्ये मोठी ढगफुटी झाली आहे. यात पाच भाविक जागीच ठार झाले आहेत. अमरनाथ मध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. ढगफुटीमुळे मोठा पुर आला आहे.
या ढगफुटीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत नेमकी कशी ढगफुटी झाली हे दिसत आहे. ढगफुटीचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
ढगफुटी होतानाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत डोंगरातून पाण्याचा मोठा लोंढा वाहत आहे. प्रचंड वेगाने पाणी दगरीत कोसळत आहे. अंगावर काटा आणणार असा हा व्हिडिओ आहे.
#WATCH | J&K: Massive amount of water flowing turbulently after a cloud burst occurred in the lower reaches of Amarnath cave. Rescue operation is underway at the site pic.twitter.com/w97pPU0c6k
— ANI (@ANI) July 8, 2022
शुकवारी संध्याकाळी ५. ३० च्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. ज्यावेळी ढगफुटी झाली त्यावेळी गुफेजवळ १० ते १५ हजार भाविक उपस्थित होते, अशी माहिती आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ५ ते ६ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी दोनच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.
अमरनाथ परिसरात सतत सुरु असलेल्या पावसात ही ढगफुटी घटना घडली आहे. ढगफुटीनंतर सिंध नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. भाविकांना सुरक्षित ठिकाणी छावणीत पोहचवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.