लोकप्रवाह, चोपडा दि. 13 जून – पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले यांनी स्व:खर्चाने संस्थेतील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी अष्टविनायक दर्शन व अन्य तीर्थक्षेत्र दर्शन या वारीचे आयोजन केले. यामध्ये १९ कुटुंबातील एकुण ६७ व्यक्तींचा सहभाग होता. सहलीचा लाभ मिळाल्यामुळे सर्व कर्मचारी हे कुटुंबासह आनंदी होते.
कर्मचाऱ्यांची जाण असणारी संस्था व संस्थाध्यक्ष फारच क्वचितच असतात, त्यामुळे डॉ. सुरेश बोरोले यांच्या दातृत्वाला सलाम..!
– संपादक
सहली दरम्यान श्री मयुरेश्वर गणपती(मोरगांव ), चिंतामणी ( थेऊर ) , सिध्दीविनायक ( सिध्दटेक ) , महागणपती ( रांजणगाव ) , विघ्नहर ( ओझर ) , गिरिजात्मक ( लेण्याद्री ) , वरद विनायक ( महाड ) , बलाळेश्वर ( पाली ) आदिंसह विविध प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद कर्मचाऱ्यांना मिळाला. डॉ. सुरेश बोरोले आपल्या संस्थेतील शिक्षकांना दरवर्षी महाराष्ट्रातील व देशांतील आदर्श शाळांना भेटीसाठी पाठवित असतात. त्यासाठी दरवर्षी अभ्यासदौऱ्यांचे आयोजन करण्यात येते. सोबतच दरवर्षी प्रेक्षणीय पर्यटन सहलींचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात येते.
सदर तीर्थक्षेत्र सहलीकरीता जाणाऱ्या वाहनाचे विधीवत पूजन पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक पंकज बोरोले यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक नारायण बोरोले, एम.व्ही.पाटील, व्ही.आर.पाटील, डॉ. महादेव वाघमोडे, मिलींद पाटील, संदीप वन्नेरे, रेखा पाटील आदींची उपस्थिती होती.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...