लोकप्रवाह, चोपडा दि. ०९ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य करुन टिका टिपण्णी केली. या अशा बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करावा व मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. सदर निवेदन प्रशासनातर्फे नायब तहसीलदार देवेंद्र नेतकर व पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी स्विकारले.
यावेळी माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, जेडीसीसी संचालक घनश्याम अग्रवाल, माजी जि.प. अध्यक्ष गोरख पाटील, इंदिराताई पाटील, माजी सभापती कल्पना दिनेश पाटील, माजी चोसाका चेअरमन अॕड. घनश्याम पाटील, चंद्रहासभाई गुजराथी, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, चोसाका चेअरमन अतुल ठाकरे, माजी कृऊबा सभापती गिरीष पाटील, उद्योगपती सुनिल जैन, माजी उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख, गोकुळ पाटील, मणिलाल पाटील, भरत पाटील, दिगंबर पाटील, भरत इंगळे, नंदकिशोर पाटील, रामचंद्र भादले, युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील, दिनेश पाटील, सुर्यकांत खैरनार, युवक तालुका उपाध्यक्ष नईम शेख, जमिल कुरेशी, रविंद्र पाटील आदिंसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.