लोकप्रवाह, चोपडा दि. ०९ – तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून नावाजलेली दि चोपडा पिपल्स को- आॕपरेटिव्ह बँक हि एक आघाडीची संस्था आहे. या बँकेच्या माध्यमातून आजपर्यंत कित्येक गरजूंना कर्ज स्वरुपात आर्थिक पाठबळ मिळून ते आज सुस्थितीत जीवन जगताय. मागील तीस वर्षापासून या बँकेची चेअरमन पदाची धुरा चंद्रहासभाई गुजराथी यांनी अतीशय सचोटीने व यशस्वीपणे सांभाळली आली. मात्र या वर्षी बँकेची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध झाली नाही. त्यामुळे बँकेची निवडणुकीकरीता दि. १३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याकरीता सद्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या प्रेरणेने व चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॕनल चे उमेदवार संचालक पदासाठी निवडणुक लढविणार आहेत.
सदर प्रचारासाठी दि. ०८ रोजी शहरातील सुंदरगढी भागात प्रचारसभा अतिशय उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार कैलास पाटील, माजी चेअरमन चोसाका घनश्याम पाटील, माजी जि.प.अध्यक्ष गोरख पाटील, अॕड. डी.पी. पाटील, अॕड.जी.के. पाटील, गिरीश पाटील, चंद्रहासभाई गुजराथी, आशिष गुजराथी, गटनेते जीवन चौधरी, नंदकिशोर पाटील, अमृतराज सचदेव, संजय कानडे, अनिल वानखेडे, रमेश शिंदे, जितेंद्र देशमुख, संजय जैन, प्रभूतात्या बडगुजर व माजी उपनगराध्यक्ष हितेंद्र देशगुख आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी परिसरातील सर्व ज्येष्ठ – श्रेष्ठ मान्यवर तसेच चोपडा पिपल्स बँकेचे सर्व पदाधिकारी, भागभांडवलधारक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आतापर्यंत या बँकेचा सर्व कारभार अतिशय पारदर्शक आणि प्रामाणिकपणे चालत आलेला आहे. अरुणभाई यांचा शब्द हा सर्व महाराष्ट्रात आदराने व सन्मानाने ऐकून घेतला जातो व त्यांच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जाते. परंतु यावेळेस त्यांचा शब्द न ऐकता विरोधकांनी हट्ट सोडला नाही. विरोधकांना वारंवार विनंती केली तसेच चेअरमन पदासाठी संधी देण्याचे मान्य केले तरी देखील त्यांनी हट्ट न सोडल्यामुळे सदर निवडणूक होत आहे. अन्यथा गेल्या ३० वर्षांपासून सदर बँकेची कोणतीही निवडणूक न होता बिनविरोध सर्व संचालक मंडळाची निवड या ठिकाणी होत होती. मात्र विरोधकांच्या हट्टामुळे हि निवडणुक होत असून यामुळे सर्व सभासदांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे माजी आमदार कैलास पाटील यांनी सांगितले. त्यानंतर आशिष गुजराथी व अॕड. घनश्याम पाटील यांनी बँकेची महती सांगितली व सहकार पॅनलच्या रोडरोलर या निशाणीवर फुलीचा शिक्का मारून आठही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासंदर्भात सर्व सभासदांना आवाहन केले.
चंद्रहासभाई गुजराथी यांनी मागील ३० वर्षांपासून चेअरमन म्हणून बँकेची धुरा यशस्वीपणे सांभाळली. त्यांनी बँकेच्या यशस्वी वाटचाली विषयी यावेळी माहिती सांगितली. त्यामध्ये त्यांनी संपूर्ण बँक ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अद्यावत झाली असून राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणेच इतर सर्व सुविधा बँकेत उपलब्ध असल्याचे सांगितले. यासोबतच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा बँकेने सतत सहभाग घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. व सहकार पॕनलच्या सर्व आठही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.