Tuesday, March 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

निकृष्ट रस्ते बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा – डॉ.चंद्रकांत बारेला 

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
November 8, 2022
in सामाजिक
0
निकृष्ट रस्ते बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा – डॉ.चंद्रकांत बारेला 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. 8 – तालुक्यातील चारही बाजूचे रस्ते खड्डेमय झाले असून रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते हा विषय संशोधनाचा झाला आहे. यामुळे दररोज कुठेतरी अपघात होऊन माणसं जखमी व जायबंदी होत असून अपघातात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांची कामे निष्कृष्ट दर्जाची होत असल्याने अपघात घडत आहेत, म्हणून संबंधित ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वाखाली डॉ.चंद्रकांत बारेला मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आली. यासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विरेंद्र राजपूत व तहसीलदार अनिल गावीत यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे की, रस्त्यांच्या कामात मलिदा खाण्याच्या वृत्तीने कामांची गुणवत्ता शून्य झाली आहे, पर्यायाने होणाऱ्या अपघातात
अनेकांना कायमचे अपंगत्व तर काही जखमी होत आहेत, आठवड्यात एखादा तरी मृत्यू या अपघातामुळे होत आहे. अनेकवेळा यासंदर्भात अनेकांनी निवेदनाद्वारे मागणी, आंदोलने तसेच मोर्चे काढूनही प्रशासन झोपेचे सोंग घेऊन आहे. रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या घटनेत संबंधित ठेकेदारावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत. तसेच रस्ते अपघातात जखमीं झालेल्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी आदी मागण्या सदर निवेदनात करण्यात आल्या. येत्या आठ दिवसांत मागण्यांची पूर्तता झाली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी डॉ.चंद्रकांत बारेला, सचिन पाटील, अमोल राजपूत, शाम जाधव, ईश्वर सूर्यवंशी, वसंत कोळी, दिलावर तडवी, दीपक वानखेडे, सचिन पाटील, राहुल अहिरे, बापू मोरे, ईश्वर भिल, अल्केश महाजन, समाधान महाजन आदिंसह डॉ.चंद्रकांत बारेला मित्रपरिवाराचे सदस्य उपस्थित होते.
Post Views: 409
Previous Post

सरपंचाव्दारे करण्यात आली मुरुमाची अवैद्य वाहतूक!! गुन्हा दाखल करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

Next Post

चोपडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आक्षेपार्ह वक्तव्याबाबत अब्दुल सत्तारांचा निषेध; गुन्हा दाखल व्हावा ही निवेदनाद्वारे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 : दोंडाईचा येथील अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजित टेक स्पार्क 2K26 या राज्यस्तरीय तांत्रिक...

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14: मा. उच्च न्यायालय, मुंबई तसेच मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये शनिवार, दि....

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11 : चोपडा नगरपरिषदेत ५ मार्च रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत विविध ६६ विषयांवर चर्चा झाली. यामधील...

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11| चोपडा नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी निवासी मालमत्तांसाठी विशेष ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे....

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

by टीम लोकप्रवाह
March 8, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 08 :  येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us