लोकप्रवाह, चोपडा दि. ०९ – येथील चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी सहा.पोलिस निरिक्षक संदिप दुनगहू यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार उमर्टी ते सत्रासेन या रस्त्याने येणाऱ्या चारचाकी वाहनामध्ये अवैध गावठी कट्टा वाहतुक होत असल्याचे कळाले. त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने पोलीस पथकामार्फत चारचाकी वाहन अडवून तपासणी केली असता सदर वाहनामध्ये एक गावठी कट्टा मॕनजीनसह आढळून आला. गावठी कट्टा अंदाजे किंमत रु. 25,000 व चारचाकी वाहन अंदाजे किंमत रु. 3,00,000/- असा एकुण 3,25,000/- चा मुद्देमाल जप्त करुन दोघा आरोपींना तात्काळ जेरबंद करीत गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील उमर्टी ते सत्रासेन रोडने पांढ-या रंगाची मारुती कंपनीची डीझायर गाडी क्रमांक एमएच 46 एक्स 1430 ने चोपड्याकडे गावठी कट्टा घेवून आरोपी येत असल्याचे वृत्त समजताच सपोनि. संदिप दुनगहू यांनी तात्काळ पोलीस पथक बोलावून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याकामी सदर पथक हे सत्रासेन ते उमर्टी गावादरम्यान असलेल्या तिन फाट्यावर संशयित वाहनाची येण्याची वाट पाहण्याकरीता आडोशाला दबा धरुन बसले असता सायंकाळी साडे पाच वाजता गावाकडून सदर पांढ-या रंगाची मारोती कंपनीची डीझायर गाडी क्र. एमएच 46 एक्स 1430 हि आली असता नाकाबंदी करून वाहन थांबवले व तपासणी केली असता मागील सीटवर बसलेल्या इसमाची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला पॅन्टला खोसलेला 25,000/- रुपये किमतीचा गावटी बनावटीचा स्टीलचा कट्टा रिकाम्या मॅग्झीन सह आढळून येताच जप्त करण्यात आला. आरोपीने नांव ज्ञानेश्वर मोहन सिरसाट वय 40 रा. भोरटेक ता. शिरपुर जि.धुळे व छगन किसन कोळी वय 72 रा. भोरटेक ता. शिरपुर जि.धुळे असे सांगीतले. दोघांनाही गावठी कट्टा हा गैरकायदेशीर खरेदी करून विक्री करण्याचे उद्देशाने बाळगल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे सीसीटीएनएस गुरनं. 145/2022 आर्म अॕक्ट 3/25,7/25 सह मुंबई पोलीस अधि. 37(1)(3) चे कलम 35 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे व सहाय्यक पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली व चोपडा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि. संदीप दुनगहू यांचे नेतृत्वाखाली पोहेकॉ. शिवाजी बाविस्कर, संजय येदे, पोना. शशिकांत पारधी, चालक पोकॉ. विनोद पाटील, पोहेकाॕ. लक्ष्मण शिंगाणे, पोहेकाँ. भरत नाईक आदिंच्या पथकाने केली असून पुढील तपास पोहेकाँ. शिवाजी बाविस्कर हे करीत आहेत.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...