लोकप्रवाह,चोपडा दि. १३ – संपुर्ण तालुक्यातील रस्त्यांचे खड्डयांमुळे तीन तेरा झाले आहेत. सर्वसामान्य जनतेच्या करातून तयार होणाऱ्या या निकृष्ट रस्त्यांमुळे पैशांचा नुसता अपव्यय सुरु असल्याचे तालुक्यात दिसून येत आहे. या निकृष्ट रस्त्यावरील खड्डयांमुळे आतापर्यंत कित्येक निरपराध नागरिकांचा अपघातात बळी गेलेला आहे. मात्र तरीसुद्धा कुंभकर्णी झोपेच सोंग घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम प्रशासनाला अद्याप जाग येत नाही. म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉ. चंद्रकांत बारेला व मित्र परिवाराच्या वतीने दि. १३ नोव्हेंबर रोजी रस्त्यांवरील खड्डयांभोवती पांढरा चुना मारुन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे अनोखे आंदोलन करण्यात आले. व येत्या आठ दिवसांत संपुर्ण रस्ते खड्डेमुक्त न झाल्यास याला जवाबदार सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.
रस्त्यावरील खड्डे बुजविण्याबाबत डॉ. चंद्रकांत बारेला मित्र परिवाराच्या वतीने या अगोदरच तहसीलदार अनिल गावीत व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता व्हि. बी. राजपूत यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र तरीसुद्धा खड्डे बुजविण्याबाबत कुठल्याही प्रकारची कारवाई होतांना दिसून येत नसल्याचे निदर्शनास आल्यावर डॉ. चंद्रकांत बारेला यांनी दोन दिवसाअगोदर संपूर्ण तालुक्यातील सुजाण व जागरुक नागरिकांना समाजमाध्यमाद्वारे आवाहन करीत “जिथे खड्डा असेल तिथे पांढरा चुना मारावा व तो फोटो सोशल मिडियावर पोस्ट करावा” असे सांगितले. त्यांच्या या आवाहनाला संपूर्ण तालुक्यातून भरमसाठ प्रतिसाद मिळाला. त्याअनुषंगाने त्यांनी आज रोजी शिरपूर बायपास, हॉटेल जयेश जवळ व अकुलखेडा गावाजवळील खड्डयांभोवती पांढरा चुना मारुन प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरीता अनोखे आंदोलन केले. यावेळी ये – जा करणाऱ्या नागरिकांनी सुद्धा त्यांच्या या आंदोलनाला पाठींबा दर्शविला. येत्या आठ दिवसांत संपूर्ण रस्ते खड्डेमुक्त होण्याकरीता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कुठलीच कारवाई न झाल्यास संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे डॉ. चंद्रकांत बारेला यांनी बोलतांना सांगितले.
यावेळी डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वात सचिन डाभे, अमोल राजपूत, निलेश जाधव, शाम जाधव, अतुल पाटील, ईश्वर सूर्यवंशी, वसंत आप्पा कोळी, दिपक वानखेडे, ईश्वर भिल, अण्णा मोरे, सचिन पाटील, भूषण पाटील, राहुल पाटील आदिंसह मित्र परिवारातील इतर सदस्य उपस्थित होते.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...