लोकप्रवाह,चोपडा दि. २२ – शहर व तालुक्यात अवैध गावठी दारुचे प्रमाण महाभयंकर प्रमाणात वाढले आहे. याला अंकुश लागावा म्हणून चोपडा ग्रामीण पोलीसांमार्फत दि. २० रोजी चौगांव, घोडगांव, मजरे हिंगोणा, हातेड बु. व उजाड कर्जाणे तसेच दि. २१ रोजी कृष्णापूर व कोळंबा येथे अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई करीत मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व सात जणांवर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र फक्त काही ठराविक काळाकरीता कारवाई न करता यावर नियमित कारवाई होणे गरजेचे आहे जेणेकरुन गावठी हातभट्टी दारु सेवनाने शारीरिक नुकसान होवून मृत्यु होणार नाही. भल्या पहाटे केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध गावठी दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत हे मात्र नक्की !!
चोपडा ग्रामीण पो.स्टे. हद्दीतील चौगांव, घोडगांव, मजरे हिंगोणा, हातेड बु. व उजाड कर्जाणे या गावांमध्ये दि. २० रोजी अवैध गावठी हातभट्टी दारु विक्रेत्यांवर कारवाई करत ४३ हजारांची विदेशी, टँगो पंच, मॕग्डॉल रम सह कच्चे रसायन जप्त करण्यात आले. या कारवाईत तालुक्यातील मोतीलाल बाविस्कर (हातेड बु.), दिलीप बाविस्कर (लासुर), शरद कोळी ( घोडगांव), संजय बारेला (उजाड कर्जाणा), व प्रताप ढिवरे (चौगांव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दि. २१ रोजी कृष्णापूर व कोळंबा येथे सुद्धा अवैध गावठी हातभट्टी दारु विक्रेत्यांवर करण्यात आली. यामध्ये ३३ हजाराचे कच्चे रसायन जप्त करण्यात आले. या कारवाईत सुकलाल सखाराम कोळी (कृष्णापूर) व रविंद्र ज्ञानेश्वर कोळी (कोळंबा) यांचे विरोधात चोपडा ग्रामीण पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...