लोकप्रवाह, चोपडा दि. २२ – महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेच्या चोपडा शाखेच्या अध्यक्षपदी तालुक्यातील मंगरूळ येथील ए. के. पाटील माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक सादिक प्यारखां तडवी यांची तर सचिवपदी महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक संजय रघुनाथ बारी यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष भरत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २० रोजी चोपडा येथे जळगांव जिल्हाध्यक्ष रणजित सोनवणे व हेमेंद्र सपकाळे ( जिल्हा उपाध्यक्ष ), एच.बी.मोतीराळे ( जिल्हा सदस्य ) यांच्या उपस्थितीत चोपडा तालुका समता शिक्षक परिषदेच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
-: कार्यकारीणी पुढीलप्रमाणे :-
उपाध्यक्ष – समाधान प्रताप बिऱ्हाडे (सी.बी.निकुंभ माध्य.व.उच्च माध्य.विद्यालय, घोडगांव), अर्जुन देवकीनंदन कोळी (अहिल्याबाई होळकर माध्य.विद्यालय, कमळगांव), सहसचिव – प्रशांत शिवाजी चव्हाण (महिला मंडळ माध्य. विद्यालय, चोपडा ), कार्याध्यक्ष – चंद्रकांत नारायणराव पाटील (शारदा माध्य.विद्यालय, खर्डी), पंकज प्रतापराव शिंदे (प्रताप विद्यामंदिर, चोपडा), तालुका संघटक – नरेंद्र शांताराम सपकाळे (सी. बी. निकुंभ माध्य.व उच्च माध्य. विद्यालय, घोडगांव), प्रसिद्धी प्रमुख – रूपेश शांताराम नेवे (सी. बी. निकुंभ माध्य.व उच्च माध्य. विद्यालय, घोडगांव ), सदस्य – रविकांत काशिनाथ पिंपरे (शामराव येसो महाजन माध्य. विद्यालय, अडावद ), प्रदिप हिरामण चौधरी (बालमोहन विद्यालय, चोपडा)
याप्रसंगी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शाहू – फुले – आंबेडकर – छत्रपती शिवाजी महाराज – सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करताना जिल्हाध्यक्ष रणजीत सोनवणे व उपाध्यक्ष हेमेंद्र सपकाळे यांनी शाखेच्या संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा देत नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. तसेच राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) उत्तीर्ण झाल्याबद्दल संजय बारी यांचा सत्कार केला. सादिक तडवी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक समता परिषदेचे जिल्हा सदस्य एच. बी. मोतीराळे यांनी, सूत्रसंचालन संजय बारी यांनी तर आभार प्रदर्शन अर्जुन कोळी यांनी केले.
Post Views: 154