लोकप्रवाह, चोपडा दि. २४ – तालुक्यातील चोपडा सहकारी साखर कारखाना हा बारामती अॕग्रोने भाडेतत्वावर चालविण्यास घेतला आहे. यंदा गळीत हंगाम सुरु होवून जवळपास वीस दिवस लोटून गेले मात्र तरीसुद्धा उसाचा दर निश्चित न केल्यामुळे व उसाला पहिली उचल २५०० मिळावी या मागणीकरीता शेतकरी संघटनेतर्फे आज रोजी ठिक अकरा वाजता कारखान्याच्या साईटवरील वजनकाट्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडोच्या संख्येत शेतकरी बांधव व महिलांची उपस्थिती होती.
सकाळी दहा वाजता कारखाना साईटवर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते पोहोचले असता त्यांना मुख्य गेटवर अटकाव करण्यात आला. जवळपास अर्धा एक तास सर्वांना तेथेच थांबविण्यात आले. त्यानंतर वजनकाट्यावर जावून शेतकरी संघटनेतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संदिप पाटील, जिल्हाध्यक्ष संजय महाजन, जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील, भरत पाटील आदिंसह इतरांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये कार्यक्षेत्रातील उसावर एफआरपी ठरवली गेली पाहिजे, चोपडा तालुक्यातील संपूर्ण उस तोडला गेला पाहिजे असे मुद्दे उपस्थित करण्यात आले. त्याबरोबरच बारामती अॕग्रो व्यवस्थापनाच्या दडपशाहीचा देखील यावेळी निषेध करण्यात आला. बारामती अॕग्रोचे जनरल मॕनेजर देशमुख यांनी वरिष्ठांशी चर्चा करुन संध्याकाळपर्यंत शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी यांच्याशी उसाच्या
दराबाबत चर्चा करणार असे सांगितल्यावर ठिय्या आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले. कारखाना व्यवस्थापनातर्फे जनरल मॕनेजर मिलिंद देशमुख यांचेसह कोंडीबा कित्तुरे, अकबर पिंजारी आदिंनी शेतकरी बांधवांशी चर्चा केली. यावेळी कारखाना साईटवर खाजगी सुरक्षारक्षकांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला. तसेच पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे, पो.ना. विलेश सोनवणे, मिलिंद सपकाळे, सुभाष सपकाळ, मधुकर पवार, मनोज पारधी, शुभम पाटील आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला.
यावेळी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संदिप पाटील, जिल्हाध्यक्ष संजय महाजन, जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील, तालुकाध्यक्ष सचिन शिंपी, सचिन डाभे, भरत पाटील, कुलदिप पाटील, देवेंद्र पाटील, महिला तालुकाध्यक्ष कविता पाटील, अजित पाटील, अखिलेश पाटील, चेतन पवार, राहुल पाटील, विनोद पाटील, प्रेमचंद धनगर, विनोद धनगर, विजय पाटील, श्याम पाटील, संग्रामसिंग राजपूत, राहुल पाटील, सुरेश पाटील आदिंसह इतर शेतकरी बांधव व महिलांची उपस्थिती होती.
Post Views: 179