Thursday, September 17, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपड्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे  “एक कॉल मदतीचा – संवाद आपुलकीचा” या अभियानाचा शुभांरभ

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 15, 2022
in राजकीय
0
चोपड्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे  “एक कॉल मदतीचा – संवाद आपुलकीचा” या अभियानाचा शुभांरभ
लोकप्रवाह, चोपडा दि. १५ जून –  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 23 व्या  वर्धापन दिनानिमित्त तसेच माजी विधानसभा अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यातून मार्ग काढण्यासाठी मदत व सहकार्य करण्याच्या हेतूने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष मयुर चंद्रकांत पाटील व तालुकाध्यक्ष सौरभ राजेंद्र ठाकरे यांच्या विचारातुन साकारलेल्या “एक कॉल मदतीचा – संवाद आपुलकीचा” या अभियानाचा शुभारंभ नुकताच अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते अरुणभाई गुजराथी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर अभियान राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यत आले. यावेळी माजी आमदार कैलास पाटील,जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, चोसाका माझी चेअरमन घनश्याम पाटील, पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, माजी जि.प सदस्य गोरख पाटील, माजी जि.प. सदस्या इंदिराताई पाटील,  प्रा. निलम पाटील, विजया पाटील, महिला तालुकाध्यक्ष भारती बोरसे, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, चोसाका चेअरमन अतुल  पाटील, चोसाका व्हाईस चेअरमन शशीकांत देवरे, सुनिल जैन,आशिष गुजराथी, सनी अलीझाड, पिपल्स बँकेचे व्हा चेअरमन प्रविण गुजराथी, गटनेते जीवन चौधरी, माजी उपनगराध्यक्ष  हितेंद्र देशमुख, माजी नगरसेवक रमेश शिंदे, हुसेन पठाण, पं.स. माजी उपसभापती सुर्यकांत खैरनार, माजी सभापती कल्पना पाटील, कल्पना पाटील, मालुबाई कोळी, रमेश सोनवणे, संजय कानडे, नंदकिशोर पाटील, ज्ञानेश्वर भादले, शरद देशमुख, नोमान काजी, युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील, युवक शहरध्यक्ष समाधान माळी, तालुका प्रसिध्दीप्रमुख संदीप कोळी, मोहसीन शेख, सुरेश पारधी, जयेश सनेर, ऋषभ जैन, तेजस पाटील आदिंसह राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी  कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. सर्वांनी या उपक्रमाबद्दल शहराध्यक्ष मयुर पाटील व तालुकाध्यक्ष सौरभ ठाकरे यांचे कौतुक केले.
असे असेल या अभियानाचे स्वरुप, “एक कॉल मदतीचा : संवाद आपुलकीचा” या अभियानांतर्गत ‘एक कॉल मदतीचा’ यात 9518504598 अथवा 7385983194 यावर संपर्क साधायचा असून विद्यार्थ्यांनी त्यांना येणाऱ्या समस्या सांगायच्या आहेत. त्यानंतर या अभियानात काम करणारे स्वयंसेवक या समस्यांसंदर्भात संबंधित विभागांशी संपर्क साधून ते काम पूर्ण करण्यासाठी अथवा समस्या निराकरणासाठी मदत व सहकार्य करतील. या अभियानामुळे विद्यार्थ्यांना एका कॉलवर आपल्या अडचणीवर मात करता येणार आहे. त्यामुळे पक्षाचा विद्यार्थ्यांशी संपर्क, भविष्यात करावयाची कामे, पक्ष संघटन, विविध कार्यक्रमांचे आयोजन यासंदर्भात चर्चा करता येणे शक्य होणार आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे “एक कॉल मदतीचा : संवाद आपुलकीचा” हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे खुद्द राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, प्रदेश सरचिटणीस रोहन सोनवणे, जळगाव जिल्हाध्यक्ष भुषण भदाणे यांच्यासह वरिष्ठांनी कौतुक केले आहे. जळगाव जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात हे अभियान राबविण्यात यावे व विद्यार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष मयुर पाटील व तालुकाध्यक्ष सौरभ ठाकरे यांनी केले आहे.
Post Views: 463
Previous Post

चोपडा नगरपालिका प्रभागनिहाय आरक्षण सोडत; तब्बल १५ प्रभागातील ३१ जागांची आरक्षण सोडत जाहीर

Next Post

पंकज  प्राथमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा…!

Next Post
पंकज  प्राथमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा…!

पंकज  प्राथमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

चोपडा शहरासह तालुक्यात पावसाचे पुनरागमन; शेतकऱ्यांमध्ये समाधान

by टीम लोकप्रवाह
September 12, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. 12 : चोपडा शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी...

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा

by टीम लोकप्रवाह
September 9, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

शिवबा स्पोर्ट्स अकॅडमीने ५ थर रचत फोडली दहीहंडी!

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि.६: चोपडा शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. रोहितदादा निकम फाउंडेशन, जळगाव यांच्या...

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

कमलेश पाटील यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

by टीम लोकप्रवाह
September 6, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 06 : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कमलेश पाटील यांची निवड...

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

गणेशोत्सवासाठी परवानगी बंधनकारक; विनापरवानगी मंडळांवर कारवाई

by टीम लोकप्रवाह
September 4, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि . 04 - आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षिततेत आणि शिस्तीत पार पडावा, यासाठी चोपडा शहर...

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

अशोक सोनवणे यांच्या ‘परिस्थितीच्या दुसेरीखाली’ काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. ३ : कविता, कवितेचा आशय-विषय, कवीची लेखनशैली, अनुभवांची व्यामिश्रता, अभिव्यक्तीचे वेगळेपण, सद्यस्थितीशी कवितेचे असलेले नाते तसेच...

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

चोपडा समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. : भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा आणि आदिवासी महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने...

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वर्धा धान्य गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करा; आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
September 3, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 03 : तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात शासकीय रेशन धान्याच्या वितरणात लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी...

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा | ३० ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला...

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खेळातून समाजसेवेचा संदेश; जयहिंद क्रिकेट क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
August 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा : जयहिंद क्रिकेट क्लब, चोपडा (चोपडा नवचेतना बहुउद्देशीय संस्था संचलित) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी...

Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us