लोकप्रवाह,चोपडा दि. २० डिसें. (संदिप ओली) – राज्यातील माहे ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित ग्रामपंचायती तसेच आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणूकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात आला. या अनुषंगाने संपूर्ण राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीकरीता दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये चोपडा तालुक्यातील एकुण पाच ग्रामपंचायतींचा समावेश होता. त्यांचा आज रोजी सकाळी नूतन प्रशासकीय भवन येथे झालेल्या मतमोजणीनंतर निकाल जाहिर करण्यात आला.
तालुक्यातील एकुण पाच ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका लागल्या होत्या. यावेळी जनतेमधून थेट सरपंच निवडण्याची पद्धत पुन्हा सुरु करण्यात आली. त्यामुळे सरपंच आणि प्रभागातील इतर सदस्य अशी निवडणुक झाली. पाच ग्रामपंचायतीमध्ये प्रामुख्याने हातेड खु., खडगाव, गोरगांवले खु., वटार व संपुले याठिकाणी ही निवडणूक पार पडली होती. यामध्ये ५ सरपंच व ४१ सदस्य निवडीकरीता हि निवडणुक घेण्यात आली होती. यामध्ये दोन सरपंच व अठरा ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झाले होते. सरपंच पदाच्या ३ जागांकरीता ७ उमेदवार तर २३ सदस्यांच्या जागेंकरीता तब्बल ४९ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये हातेड खु. च्या सरपंचपदी शालीनी रमेश सोनवणे तर सनफुले च्या सरपंचपदी पुंजु अर्जुन कोळी यांची यापुर्वीच बिनविरोध निवड झाली होती. गोरगांवले खु. येथे देवका़बाई भिकन फुगारे, वटार येथे भिकुबाई सुभाष कोळी तर खडगावच्या सरपंचपदी कविता रविंद्र चव्हाण यांनी विजय मिळविला. मतदान ७३.३६ टक्के इतके झाले होते. कस्तुरबा माध्यमिक शाळेजवळील नूतन प्रशासकीय भवनात सकाळ पासून मतमोजणीला सुरुवात झाली. जसजसे निकाल हाती येत होते तसतसे विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. विजयी गटाच्या उमेदवारांनी तिथेच गुलालाची उढळन करीत विजयोत्सव साजरा केला.
सदर निवडणूक कार्यक्रमाकरीता निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिल गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार सचिन बांबळे, नायब तहसीलदार देवेंद्र नेतकर, रविंद्र माळी, केंद्रप्रमुख नरेंद्र सोनवणे, अव्वल कारकुन हेमंत हरपे,
मंडळाधिकारी मनोज साळुंखे, महेश पानघट्टीवार, किरण सांळुखे, शहर तलाठी किरण महाजन, अजय पावरा यासह इतर अधिकारी, तलाठी व कोतवाल आदिंनी परिश्रम घेतले. तसेच मतमोजणीच्या ठिकाणी सहा. पोलीस निरीक्षक अजित सावळे, संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे, सफौ. सुनिल पाटील, सफौ. जितेंद्र सोनवणे, हेडकाँ. प्रदिप राजपूत, हेडकाँ. दिपक विसावे, पोना. विलेश सोनवणे, ज्ञानेश्वर जवागे, किरण गाडीलोहार, मधुकर पवार, किरण पाटील, सुनिल कोळी आदिंसह चोपडा शहर, ग्रामीण व अडावद पो. स्टे. येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त बजावला.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...