Monday, March 16, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

चोपडा येथील गुंजन पाटील फायनांशीयल अॕनालीसीस परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण!

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
December 22, 2022
in विशेष, शिक्षण
0
चोपडा येथील गुंजन पाटील फायनांशीयल अॕनालीसीस परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लोकप्रवाह, चोपडा दि. २२ डिसें. (संदिप ओली) – साधारण दोन वर्षांपुर्वी लंडन येथील विश्वविख्यात युनिव्हर्सिटीत मेरीटमध्ये येऊन बिझिनेस मॅनेजमेंट सायन्स (MS) मध्ये शिक्षण घेणाऱ्या चोपडा येथील भूमीकन्येने आपल्या बुद्धीचातुर्याच्या बळावर थेट अमेरिकेत आपल्या यशाचा ‘झेंडा’ रोवला आहे. शोभा शामराव पाटील (काजीपुरेकर) यांची नात व वंदना राजेंद्र पाटील यांची सुकन्या ‘गुंजन’ आपल्या शैक्षणिक गुणांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आली आहे. यावेळी तिने अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ सॕनफ्रँसिस्को येथे एमएस इन फायनांशियल अॕनालाईस यामध्ये तब्बल ९४ टक्के गुण मिळवत फर्स्ट क्लास विथ डिस्टींकशन ने उत्तीर्ण झाली आहे.
            गुंजन मुळातच लहानपणापासून अभ्यासात हुशार आहे. घरात उच्चशिक्षित असं कुणी नसलं तरी घरातील वातावरण मुख्यत्वे आई वंदना आणि वडील राजेंद्र पाटील यांचा गुंजन हिच्या शिक्षणासाठी असलेली धडपड आणि तिच्यावर दाखवलेला विश्वास गुंजनने वेळोवेळी सार्थ ठरवला आहे. विदेशात उच्चशिक्षण घेत असली तरी आपल्या पालकांनी आपल्यावर केलेले संस्कार हेच सदासर्वदा अग्रस्थानी स्मरणात ठेवत गुंजन आपली यशस्वी वाटचाल करतांना दिसत आहे. या यशाबद्दल बदल अमेरिकेतील सेन्स फ्रान्सिस्को येथील युनिव्हर्सिटीत नुकत्याच झालेल्या दैदिप्यमान सोहळ्यात गुंजनचा विशेष गौरव करण्यात आला. तिच्या या यशस्वी शैक्षणिक प्रवासासाठी जिल्हाभरातून अनेकांनी तिचे कौतुक व अभिनंदन केले आहे.
Post Views: 822
Previous Post

चोपडा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर…!!

Next Post

चोपडा येथील निशांत चौधरी याने राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावले कांस्य पदक!

Next Post
चोपडा येथील निशांत चौधरी याने राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावले कांस्य पदक!

चोपडा येथील निशांत चौधरी याने राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावले कांस्य पदक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

टेक स्पार्क 2K26 स्पर्धेत चोपडा अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 : दोंडाईचा येथील अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजित टेक स्पार्क 2K26 या राज्यस्तरीय तांत्रिक...

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात 92 प्रकरणे निकाली; 17.95 लाखांची वसुली

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14: मा. उच्च न्यायालय, मुंबई तसेच मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये शनिवार, दि....

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

चोपडा नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठरली वादळी!

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11 : चोपडा नगरपरिषदेत ५ मार्च रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत विविध ६६ विषयांवर चर्चा झाली. यामधील...

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

चोपडा नगरपरिषदेकडून ‘अभय योजना’ जाहीर; मालमत्ता कराच्या व्याज व दंडावर १००% सूट

by टीम लोकप्रवाह
March 11, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 11| चोपडा नगरपरिषदेमार्फत शहरातील नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी निवासी मालमत्तांसाठी विशेष ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे....

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

आनंदी जीवननासाठी कला गुण कौशल्य आत्मसात करावेत – डॉ.संजय पाटील

by टीम लोकप्रवाह
March 8, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा दि. 08 :  येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us