लोकप्रवाह, चोपडा दि. २७ डिसें. (संदिप ओली): येथील तापी शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलच्या उमेदवारांनी सर्वच २१ जागांवर मोठ्या मताधिक्याच्या फरकाने विजय मिळवून एकतर्फी विजय मिळविला तर भाजपा प्रणित सुतगिरणी बचाव पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडाला. निवडणुकीत भाजप प्रणित पॅनलला एकाही जागेवर विजय मिळाला नाही. विशेष म्हणजे या निवडणुकीत मंत्री ना. गिरीष महाजन यांनी स्वतः लक्ष घालून देखील निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. सुतगिरणीच्या निवडणुकीत मिळालेला विजय म्हणजे “धनशक्ती विरुद्ध जनशक्ती” चा विजय असल्याची प्रतिक्रिया सुतगिरणीचे चेअरमन तथा माजी आमदार कैलास पाटील यांनी निकालावर बोलतांना दिली.
येथील तापी शेतकरी सहकारी सुतगिरणीसाठी २०२२ ते २०२७ या कालावधी च्या पंचवार्षिक निवडणुकीत कापुस उत्पादक शेतकरी मतदार संघ(१५), इतर मागास प्रवर्ग(०१), बिगर कापुस उत्पादक शेतकरी मतदार संघ (०१), भटक्या विमुक्त जाती/जमाती/विशेष मागास प्रवर्ग (०१), अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ (०१), महिला प्रतिनिधी मतदार संघ- (०२) अशा एकूण २१ जागांसाठी महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनल आणि भाजपा प्रणित सुतगिरणी बचाव पॅनल या दोन पॅनल मध्ये लढत झाली. या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्यासह जळगाव जिल्ह्याचे सुद्धा लक्ष लागले होते. महाविकास आघाडी प्रणित सहकार पॕनलचे भाजपा प्रणित सुतगिरणी बचाव पॕनलला धोबीपछाड देत सर्व २१ जागांवर विजय मिळविला. सदर निवडणुकीमध्ये माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष अॕड. संदीप पाटील, चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, चोसाका माजी अध्यक्ष अॕड. घनश्याम पाटील, नगरपरिषद गटनेते जिवन चौधरी, जिल्हा बँक संचालक घनश्याम अग्रवाल, उद्योजक सुनील जैन, शिवसेना (ठाकरे गट) महिला जिल्हाप्रमुख रोहिणी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील व काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रा. प्रदिप पाटील आदींच्या परिश्रमामुळे सहकार पॅनलला यश मिळाले.
निवडून आलेले उमेदवार व त्यांना मिळालेली मते
कापूस उत्पादक मतदारसंघ
पाटील कैलास गोरख – ४५९१
पाटील हिरालाल छन्नू – ४३५७
पाटील चंद्रकांत गुलाबराव – ४३५७
पाटील राजेंद्र भास्कर – ४३४९
पाटील शशिकांत शांताराम – ४३२६
पाटील साहेबराव शंकर – ४३००
महाजन अनिल काशिनाथ – ४२८५
पाटील प्रल्हाद रघुनाथ – ४२६०
चौधरी कालिदास डुमन – ४२४९
पाटील संजय उत्तमराव – ४१८४
चौधरी रामदास एकनाथ –४१७६
जैन जवरीलाल घेवरचंद – ४१३५
पाटील विनायक संतोष – ४१३५
पाटील श्रावण धनगर – ४०६७
सोनवणे देविदास शंकरराव- ३९९४
इतर मागास प्रवर्ग मतदार संघ
सोनवणे रमेश हिंमतराव – ४७७७
बिगर कापूस उत्पादक शेतकरी मतदार संघ
वाघ अमृतराव दत्तात्रय – ४६२५
भटक्या विमुक्त जाती / जमाती/ विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ
बागुले सुनील सीताराम – ४७३८
अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ
कोळी कैलास ताराचंद – ४९०८
महिला प्रतिनिधी मतदार संघ
बोरसे भारती महेंद्र – ४६५१
पाटील कमलबाई रमेश – ४३६२
शहरातील आनंदराज पॅलेस येथे मतमोजणी पार पडली. यावेळी दोन्ही पॅनलचे कार्यकर्ते व प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते. मतपेट्या उघडल्यानंतर २५ मतपत्रिकांचे गठ्ठे बनविण्यात आले त्यानंतर दुपारी मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीत सुरुवातीपासूनच सहकार पॅनलचे सर्वच उमेदवारांची आघाडी शेवटपर्यंत कायम होती. मतमोजणी केंद्राबाहेर ढोल ताश्याच्या गजरात गुलाल उधळत सहकार पॅनलचे कार्यकर्ते आनंद साजरा करीत होते. मतमोजणीचे काम शांततेत पार पडले. बॅलेटपेपरचे मतदान असल्यामुळे मतमोजणीला तब्बल पंधरा तास लागले. त्यामुळे रात्री उशिरा ११ वाजता निकाल जाहीर करण्यात आला. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहा.निबंधक एस. एफ. गायकवाड यांनी काम पाहिले. मतमोजणीसाठी सहकार अधिकारी खुलेश पाटील, बारी, संजय पाटील, विकास सोसायटीचे सचिव दत्तात्रय पाटील, अशोक पाटील आदींनी परिश्रम घेतले. यासाठी शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि.अजित साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ. शेषराव तोरे, शेषराव तोरे, रत्नमाला शिरसाट, प्रमिला पवार, हरिश्चंद्र पवार, प्रमोद पाटील, हंसराज कोळी, मनोहर पवार आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला.
Post Views: 388