लोकप्रवाह, चोपडा दि. ०२ जाने. (संदिप ओली): जळगाव जिल्ह्यात अवैध शस्त्र जवळ बाळगण्याचे जास्त प्रमाण वाढल्यामुळे त्याबाबत शोध घेवून योग्य ती कारवाई करा असे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना दिले. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेकडील पोहेकाँ. संदिप पाटील, गोरख बागुल, पोना प्रविण मांडोळे, परेश महाजन सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव अश्यांचे पथक नेमण्यात आले.
पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, चोपडा शहरातील कारगील चौक भागात पिवळा टि शर्ट घातलेला इसम हा कमरेला गावठी कट्टा घेवून फिरत आहे. त्यावरून वरील पथक हे चोपडा येथे रवाना होवून चोपडा शहरातील भाऊ हॉटेलसमोर मिळालेल्या बातमीप्रमाणे सशंयीत इसम दिसल्याने त्यास थांंब असे म्हणताच तो पळू लागला असता त्यास वरील पथकाने जागीच पकडून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या कमरेला १ गावठी बनावटीचा पिस्तुल व त्याचे मॅगझीन मध्ये १ जिवंत काडतुस मिळाले. त्यास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अजित गुजर बारेला, वय ३७, रा. रंगराव आबा नगर, मल्हारपुरा, चोपडा ता.चोपडा मुळगाव रा. पानसेमल ता. पानसेमल जि. बडवाणी मध्यप्रदेश असे सांगितले. आरोपीला पथकाने ताब्यात घेवून त्याचे कडून ३००००/-रु. किंमतीचे १ गावठी पिस्टल व १,०००/- रु. किमतीचे १ जिवंत काडतुस असा मुद्देमाल जप्त करुन त्यांचे विरुध्द चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोना. ज्ञानेश्वर जवागे करीत आहे.