लोकप्रवाह, चोपडा दि. ०८ जाने. (संदिप ओली) – तालुक्यात प्रथमच लाल मातीतील देशी आखाड्याला सुरुवात करण्यात आलेली आहे. शहरातील भागोदय नगर येथील बोल बजरंग बहुउद्देशिय संस्थेने याची मुहुर्तमेढ रोवली आहे. दि. ०७ जानेवारी रोजी बोल बजरंग तालिम व कुस्ती संकुलन या देशी आखाड्याचा उद्घाटन सोहळा थाटात पार पडला. याप्रसंगी आत्मा मलिक, उखळवाडी येथील प.पू. रामदास बाबा, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, पै. भानूदास शंकर विसावे, पै. एकनाथ कालु भोई, पै. नामदेव विठ्ठल मोरे, पै. संजय महाजन आदिंसह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला श्री हनुमानजींच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा यावेळी पुष्पगुच्छ देवून स्वागतपर सत्कार करण्यात आला. यावेळी आत्मा मालिक, उखळवाडी चे प. पू. रामदास बाबा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्याच बरोबर वरणगांव येथील पहिलवान नामदेव विठ्ठल भोई, धरणगांव येथील पै. भानुदास शंकर विसावे व बाळासाहेब चव्हाण, वरणगांव यांनी उपस्थित युवकांना कुस्तीचे व व्यायामाचे जीवनातील महत्व समजावून सांगितले व तरुणांनी निर्व्यसनी राहण्याचा सल्ला दिला. अध्यक्षीय भाषणातून प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी बोलतांना सांगितले की, मी आमदार फक्त क्रिडा क्षेत्रामुळे झालो, कारण जीवनात खेळाडू वृत्ती महत्वाची असते आणि ती या क्षेत्रात आल्यामुळेच मिळाली. त्यामुळे राजकारण करतांना त्या गोष्टीचा उपयोग होतो. जिद्द असली तर आपण काहीही करु शकतो असे म्हणत त्यांनी तरुणांना व्यायाम करण्याचा सल्ला दिला. कारण निरोगी राहायचे असेल तर व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे डॉक्टरांपासून दूर राहु शकतो असेही त्यांनी सांगितले. जिद्द, जोम आणि परंपरा ज्याच्या अंगी असेल त्याला यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडीलांचा आशिर्वाद महत्वाचा असतो त्यामुळे त्यांचा सल्ला घ्या, त्यांचे ऐका असेही सांगितले. तसेच सदर आखाड्याला कुस्तीकरीता ग्रीन मॕट तसेच बांधकाम करीता १० लाखाचा निधी देण्याचे जाहीर केले. त्या बरोबरच या व्यायामशाळेला भविष्यात देखील कुठलाच निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाला शिवसेना तालुका संघटक सुकलाल कोळी, माजी नगरसेवक महेंद्र धनगर, मनसे शहराध्यक्ष पुंडलिक महाजन, अॕड. धर्मेंद्र सोनार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शामसिंग परदेशी, डॉ. नरेंद्र शिरसाठ, डॉ. रोहन पाटील, सागर ओतारी, श्रीराम भोई (वरणगांव), प्रकाश मराठे आदिंची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन निलेश सोनार यांनी केले. कार्यक्रमाकरीता बोल बजरंग बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष दिपक महाजन, उपाध्यक्ष नंदु गवळी, सचिव प्रदिप पाटील, शेखर महाजन, विक्की धनगर (जळगांव), नितीन महाजन, निलेश महाजन, विपूल पाटील(पाचोरा), ज्ञानेश्वर जाधव, संदिप कंखरे(धरणगांव), महेश वाघ, अमोल माळी, गोरख महाजन, पप्पु माळी(धरणगाव), राहुल पाटील (पाचोरा), भोला महाजन, बबलु कोळी(गिरड), समाधान महाजन, क्रिडा शिक्षक एस.एस. पाटील, नरेंद्र महाजन, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष समाधान माळी आदिंसह बोल बजरंग बहुउद्देशिय संस्था, समस्त फुलमाळी समाज पंच मंडळ, मोठा माळीवाडा, फुले नगरचा राजा मित्र मंडळ, बॉडी पॉवर फिटनेस क्लब, मातोश्री टेंट हाऊस व मोरया फिटनेस या सर्वांचे सहकार्य लाभले. तसेच कार्यक्रम यशस्वीतेकरीता बोल बजरंग तालिमचे अध्यक्ष विजय गंगाराम माळी व उपाध्यक्ष अजय मराठे यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...