लोकप्रवाह,चोपडा दि. ३० डिसें. (संदिप ओली) – जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत चोपडा पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध क्रीडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. दिनांक २७ डिसेंबर व २८ डिसेंबर रोजी क्रिकेट, कबड्डी, हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ, बँडमिंटन व खो-खो अश्या विविध प्रकारात स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या. यामध्ये बहुसंख्य अधिकारी व कमर्चारी यांनी सहभाग घेतला. सदर स्पर्धेचे उद्घाटन गट विकास अधिकारी तथा क्रीडा समितीचे अध्यक्ष भरत कोसोदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. तर प्रमुख अतिथी म्हणून गट शिक्षणाधिकारी तथा सचिव डॉ. भावना भोसले, कला शास्त्र व वाणिज्य महविद्यालयाचे प्राचार्य डी.ए. सूर्यवंशी, क्रीडा समितीचे सदस्य तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी एस. आर. धनगर, कृषी अधिकारी डी. एम. शिंपी, बांधकाम शाखा अभियंता दीपक डोखे, विस्तार अधिकारी पंचायत जितेंद्र पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर गजरे, कृषी विस्तार अधिकारी योगिनी सोनवणे, केंद्र प्रमुख नरेंद्र सोनवणे, अशोक सैंदाणे, उत्तम चव्हाण, दिपक पाटील आदि उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती येथील अधिकारी तसेच कर्मचारी यांचे आरोग्य, शारीरिक सुदृढता तसेच एकसंघपणे काम करणेबाबत जाणीव होणेकामी प्रभावीपणे सहाय्य होईल त्याचबरोबर जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जतन करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या आदेशान्वये या क्रीडास्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रास्ताविक मनोगतातून गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांनी जीवनात स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी क्रीडा स्पर्धेचे मोठे योगदान आहे तसेच सर्वांनी सर्व क्रीडा स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन करून सर्वाना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय मनोगतातून गट विकास अधिकारी भरत कोसोदे यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी प्रत्येक खेळात सहभागी झाले पाहिजे व उत्तम पद्धतीने खेळले पाहिजे. खेळामुळे अंगी खेळाडूवृत्ती बांधली जाते. जिंकण्यासाठी लढा, पण त्यामुळे कटुता येणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले व सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पंच म्हणून क्रीडा शिक्षक नरेंद्र महाजन, विजय पाटील, अरविंद जाधव, अजय सैंदाणे, ललित सोनवणे, जगदीश जाधव, अमोल पाटील, देविदास महाजन, आर. टी. पाटील, नईम शेख, बडगुजर, अब्दुल सलाम आदिंनी भुमिका बजावली. स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रताप विद्या मंदिरचे क्रीडा शिक्षक नरेंद्र महाजन यांनी केले तर आभार चोपडा पंचायत समिती स्वच्छ भारत मिशन चे तालुका समन्वयक जितेंद्र महाजन यांनी मानले. क्रीडा स्पर्धा यशस्वीतेकरीता पंचायत समिती क्रीडा समिती सदस्य उपशिक्षक आर. पी. आल्हाट, उपशिक्षक विवेक पाटील, पंचायत समितीचे पेसा तालुका समन्वयक प्रदीप बाविस्कर, स्वच्छ भारत मिशनचे तालुका समन्वयक जितेंद्र महाजन, विषयतज्ञ रविराज शिंदे, परीक्षित चव्हाण, राकेश पाटील, अमित डूडवे यांनी मेहनत घेतली.
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 14 - येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेले येथील बेवारस मनोरुग्ण उपचार व पुनर्वसन...
टिम लोकप्रवाह, चोपडा - तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी पटट्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी बाप संजय नानसिंग पावरा (वय 23) याने स्वतःच्या...