टीम लोकप्रवाह, चोपडा दि. ०२ जून – तालुक्यातील नागलवाडी येथील चोपडे शिक्षण मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठल्याही खाजगी शिकवणी मध्ये न जाता केवळ शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन व स्वतःच्या मेहनतीवर प्रताप विद्या मंदिरात कॉफीमुक्त वातावरणात झालेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेत ग्रामीण भागातील नागलवाडी येथील माध्यमिक विद्यालय शाळेचा निकाल ९३.७५ % लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक सागर योगेश पाटील ८२.४०%, द्वितीय – खुशी विकास वाघ ७६.००%, तृतीय कल्याणी रवींद्र पाटील ७४.२०%, चतुर्थ – पिनू सुरेश कुंभार ७१.२० % तर पाचवा क्रमांक चैताली विनोद पाटील ७१.०० % हिचा आला आहे. तसेच विशेष प्रविण्यात ०२, प्रथम श्रेणीत १२, द्वितीय श्रेणीत १४ तर तृतीय श्रेणीत ०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
राज्यमंत्री ना. पंकज भोयर यांची रोटरी उत्सवास सदिच्छा भेट
टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 23 : रोटरी क्लब गांधी सिटीच्या वतीने स्वावलंबी मैदानावर सुरु असलेल्या रोटरी उत्सवास राज्याचे गृहनिर्माण (ग्रामिण),...