Sunday, August 2, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

ग.स. शाखाधिकारी शिवाजी बाविस्कर यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न !!

सेवानिवृत्तीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन..

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 3, 2023
in सहकार, तालुका विशेष
0
ग.स. शाखाधिकारी शिवाजी बाविस्कर यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न !!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टिम लोकप्रवाह, चोपडा दि. ०३ जून – येथील ग. स. संस्थेच्या शाखा चोपडा नं. ३ चे शाखाधिकारी शिवाजीराव यशवंतराव बाविस्कर हे मूळ चोपडा तालुक्यातील घोडगाव येथील पण वडील कामानिमित्त असलोद मंदाणे (ता. शहादा) येथे स्थायिक झाल्याने शिवाजीराव शाळा शिकत असतांनाच शाळेच्या गेटजवळ गोळ्या बिस्किट विकायचे. सुट्टीच्या दिवशी ते लोटगाडीवर भाजीपाला विकायचे, दिवाळीला फटाके, कंदील व पतंगच्या किरकोळ विक्रीतून पैसा जमवून बी. कॉम. झाल्यावर घर परिवाराचा गाडा चालविण्यासाठी रिक्षा चालवू लागले. अशा खडतर प्रवासातून त्यांचे हातेड खुर्द येथील शिवाजी सोनवणे यांच्या सुकन्या मिनाक्षी यांचेशी विवाह झाला. सासरे शिक्षकनेते असल्याने त्यांचे ग.स. च्या नेतेमंडळींशी जवळचे संबंध होते. त्यांच्या ओळखीने शिवाजीरावांना ग. स. संस्थेत लिपिकची नोकरी मिळाली. त्यांचे अंगी असलेल्या वक्तशीरपणा व शिस्तबद्धता यामुळे त्यांची उपशाखाधिकारी नंतर शाखाधिकारी पदावर पदोन्नती झाली. आधीच उशिरा मिळालेली नोकरी करीत असताना सुद्धा त्यांनी स्वतःच्या मुलांसह भावांची मुलेही उच्चशिक्षित केलीत. त्यांचा मुलगा, मुलगी व जावई नोकरीला आहेत. आई-वडिलांप्रमाणेच त्यांनी सासूसासर्‍यांचीही काळजी घेतली. संस्थेची प्रामाणिकपणे २७ वर्षे सेवा करून नुकतेच ते सेवानिवृत्त झाले.
शिवाजीराव बाविस्कर यांचा सपत्नीक सत्कार करतांना सर्व मान्यवर, मित्रमंडळ, आप्तेष्ट व इतर..
       त्यांच्या सेवापुर्ती सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार नेते आर. एच. बाविस्कर, प्रमुख पाहुणे म्हणून ग.स.चे माजी संचालक रमेश शिंदे, देवेंद्र पाटील, विद्यमान संचालक मंगेश भोईटे, योगेश सनेर, शिक्षकनेते एकनाथ पाटील यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे ग.स. स्टाफच्या वतीने यथोचित स्वागत करण्यात आले. तसेच प्रमुख सत्कारार्थी शिवाजीराव बाविस्कर यांचा पुष्पगुच्छ, हार व प्रतिमा देत सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक उपशाखाधिकारी संजय पाटील यांनी केले. मान्यवरांनी आपल्या भाषणात बाविस्कर यांच्या सेवाकार्याचे कौतुक केले. याप्रसंगी शिवाजीराव बाविस्कर यांचे स्नेहीप्रेमी, सहकारीमित्र, नातेवाईक, भाऊबंदकीची मंडळी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभागीय अधिकारी नारायण शिरसाठ, शाखाधिकारी माधवराव सोनवणे, स्मिता मोरे, दिलीप सपकाळे, जगन्नाथ बाविस्कर यांचेसह सर्व उपशाखाधिकारी व कर्मचारी बंधूभगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचलन वसंत पाटील (बोरखेडा) यांनी तर आभार प्रदर्शन उज्वल शिंदे (वर्डी) यांनी केले. यावेळी उपस्थितांनी येथेच्छ स्नेहभोजनाचाही आस्वाद घेतला.
Post Views: 810
Previous Post

नागलवाडी येथील माध्यमिक विद्यालय शाळेचा निकाल ९३.७५ % !!

Next Post

वर्धेकरांनी साजरी केली एक आगळीवेगळी वटपौर्णिमा !

Next Post
वर्धेकरांनी साजरी केली एक आगळीवेगळी वटपौर्णिमा !

वर्धेकरांनी साजरी केली एक आगळीवेगळी वटपौर्णिमा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

‘लोकप्रवाह न्यूज’च्या बातमीची वन विभागाकडून दखल; स्वामीनारायण मंदिर परिसरात पाहणी

by टीम लोकप्रवाह
August 1, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 01 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात तरस (तडस) दिसल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीबाबत ‘लोकप्रवाह न्यूज’ने सविस्तर...

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

स्वामीनारायण मंदिर परिसरात तरसाची दहशत; वन विभागाने तातडीने कारवाई करावी, नागरिकांची मागणी

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरस हा जंगली प्राणी वारंवार दिसत असल्याची...

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

by टीम लोकप्रवाह
July 30, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 30 : शहरातील बजरंग नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस चाललेल्या पारायण,...

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांबाबत जनजागृती उपक्रम

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, दि. १७ जुलै, चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भटक्या जनावरांमुळे...

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

डोंबिवलीतील महिला डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमए चोपडातर्फे तहसीलदारांना निवेदन

by टीम लोकप्रवाह
July 17, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा, दि. १७ जुलै : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील महिला डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्थानिक...

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी साकारत असलेल्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात!

by टीम लोकप्रवाह
July 15, 2026
0

टीम लोकप्रवाह, चोपडा, दि. १५ जुलै : अपनाही घर प्रतिष्ठान या बेवारस व निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या मानव...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us