टिम लोकप्रवाह, वर्धा दि. ४ जून (दिलीप पिंपळे) : महावितरण कंपनीने भर उन्हाळ्यात विजेच्या दरात मोठी वाढ करून विद्युत ग्राहकांना दरवाढीचा जणू काही शाॅकच दिला, आहे, यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहक व नागरिकांवर या दरवाढीचा बोजा पडणार आहे, याअगोदर ० ते १०० युनिट विद्युत वापरासाठी ३.३६ पैसे / युनिट दर आकारण्यात येत होते आता हे दर ४.४१ पैसे एवढे करण्यात आले असून १.०५ पैसे / युनिट वीज दर वाढविण्यात आले आहे, तर १०० ते ३०० युनिटपर्यंत याअगोदर ७.३४ पैसे / युनिट दर होते आता ते दर ९.६४ पैसे करण्यात आले म्हणजेच तब्बल २.३० पैसेची वाढ करण्यात आली आहे. ३०० ते ५०० युनिट पर्यंत याअगोदर १०.३७ पैसे/ युनिट दर होते आता १३.६२पैसे दर आकारण्यात आले असून चक्क ३.३४पैशाची वाढ करण्यात आली आहे. ५०० ते १००० युनिटपर्यंत ११.८६ पैसे/ युनिट दर होते आता १५.५७पैसे दर आकारण्यात आले असून चक्क ३.७१ पैशाची वाढ करण्यात आली आहे. अशा झालेल्या दरवाढीमुळे सामान्य वीज ग्राहकांना अक्षरशः ताप येणार हे मात्र नक्की!!
अगोदर वीज बिल तीनं महिन्यांनी यायचे तर आता दर महिन्याला विजेचे बिल येतात. महिन्याकाठी विज ग्राहकांकडून बिलामागे स्थिर आकार, प्रत्येक विज जोडणी साठी महिन्याला प्रत्येक विज बिलावर १०५ रूपये आकारण्यात येत होता आता ११६ रुपये आकारण्यात आला असून यात ११रुपयाची वाढ करण्यात आली आहे. वहन आकार इंधन समायोजन आकार विज बिलावर १६ टक्के विज शुल्क आकारले जात आहे. विज वहन आकार १.१७ होता तो आकार १.३५ करण्यात आला आहे. सामान्य ग्राहक १०० युनिटच्या वरच विजेचा वापर करतो याचाच फायदा घेण्यासाठी १००ते ३०० पर्यंत युनिट चे दर दुप्पट करण्यात आले असून महावितरण कंपनी कडून चक्क विद्युत ग्राहकाची एक प्रकारे लुटच केली जात आहे. महागाईच्या गर्तेत सापडलेल्या सामान्य ग्राहकांना भर उन्हाळ्यात महावितरणने दिलेला हा एक शाॅकच मनावा लागेल.