Sunday, May 3, 2026
Lokprawah
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Lokprawah
No Result
View All Result

आधार फाउंडेशनच्या महिलांनी वटवृक्ष लावून साजरी केली वटसावित्री

आधार फाउंडेशन महिला समितीचा स्तुत्य उपक्रम

टीम लोकप्रवाह by टीम लोकप्रवाह
June 4, 2023
in विदर्भ, वर्धा जिल्हा, वैशिष्ट्यपूर्ण
0
आधार फाउंडेशनच्या महिलांनी वटवृक्ष लावून साजरी केली वटसावित्री
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

टिम लोकप्रवाह, हिंगणघाट दि. ४ जून : येथील आधार फाउंडेशन महिला समितीच्या वतीने दरवर्षी वटवृक्ष लावून वटसावित्री साजरी केली जाते यावर्षी स्थानिक आनंद नगर येथील साई मंदीर परिसरामध्ये वटवृक्षाचे रोपण प्राचार्य शालिनी वंजारी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य अर्चना मुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. वटवृक्ष लावणे ही काळाची गरज ओळखून हा उपक्रम राबविला जातो वडाला अक्षय वृक्ष म्हणतात या वृक्षाचा कधीच क्षय होत नाही तो सतत वाढत जातो वडाच्या पारंब्या जमिनीतून पुन्हा पुन्हा उगवतात त्यामुळे झाडाचा विस्तार होतो व त्याला आयुष्य उदंड लाभते त्याच्या विशाल आकार व भरपूर पाने असल्याने तो अनेक विषारी वायू शोषून घेतो हवा शुद्ध ठेवतो त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सदापर्णी बहुवार्षिक वृक्ष म्हणजे वटवृक्ष होय.

वटवृक्षरोपणप्रसंगी उपस्थित अतिथी व आधार फाउंडेशन महिला समितीच्या सदस्या..

वटवृक्ष हा थंड व सर्वाधिक प्राणवायू देणारा असून त्याची साल व मूळ अतिशय गुणकारी समजली जात असल्यामुळे परंपरा व पर्यावरण यांची सांगड घालून वटवृक्ष रोपण व त्याचे संवर्धनाचे काम आधार फाउंडेशनच्या महिला समितीने हाती घेतलं आहे मागील सहा वर्षापासून हिंगणघाट शहरामध्ये विविध जातींच्या वृक्षाचे रोपण व वृक्षवाटप करून आजपावेतो शेकडो वृक्षाचे रोपण व त्याचे संवर्धनाचे कार्य आधार फाउंडेशन कडून होत आहे. तसेच परंपरा आणि पर्यावरण यांची सुंदर गुंफन करीत वटवृक्षाचे रोपण करुन अतिशय स्तृत्य असा उपक्रम आधार फाऊंडेशनच्या महिला समितीकडून राबविला जातो. तेव्हा सर्वानी आपआपल्या परिसरात जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षारोपण करा, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.

वटवृक्षरोपणाच्या यशस्वी आयोजनासाठी माधुरी विहीरकर, माया चाफले, वीरश्री मुडे, ज्योती धार्मिक, वैशाली लांजेवार, स्वाती वांदीले, अनिता गुंडे, वैशाली हेडावू, मयूरी देशमुख, कविता घोडे, निलाक्षी बुरीले, प्रिती कलोडे, वैशाली सायंकार, प्रणिता तपासे, मिनाक्षी फुलबांधे, शारदा डुंबरे, लता गिरी, कल्पना पाटील, रोशनी नलवडे, केतकी मेढुंले, रेखा वाकडे व कविता कोसुरकर आदींसह इतर महिला सदस्यांनी सहकार्य केले.

 

Post Views: 589
Previous Post

भर उन्हाळ्यात महावितरणचा वीज ग्राहकांना भाववाढीचा शाॅक !!

Next Post

कराळे मास्तरांना आमदार करूच- माजी मंत्री अॕड. यशोमती ठाकूर

Next Post
कराळे मास्तरांना आमदार करूच- माजी मंत्री अॕड. यशोमती ठाकूर

कराळे मास्तरांना आमदार करूच- माजी मंत्री अॕड. यशोमती ठाकूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Page

ताज्या बातम्या

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

चोपडा येथे ‘एन-मुक्ता’ तालुका मेळावा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 25, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 25 : चोपडा येथे आयोजित करण्यात आलेला ‘एन-मुक्ता’चा तालुका मेळावा उत्साहपूर्ण व यशस्वी वातावरणात संपन्न झाला....

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यशाचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

by टीम लोकप्रवाह
April 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 22 : येथील विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा गौरव करण्यासाठी...

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

चोपडा येथील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा

by टीम लोकप्रवाह
April 21, 2026
0

टिम लोकप्रवाह, चोपडा दि. 21– चोपडा शहरात जुन्या वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणाचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या २४ तासांत...

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

🚨 स्पेशल रिपोर्ट | पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई !!

by टीम लोकप्रवाह
April 19, 2026
0

टीम लोकप्रवाह,  चोपडा दि. 19 : चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी कार्यभार हाती...

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

माजी खासदार दत्ताजी मेघे यांचे निधन; विदर्भात शोककळा

by टीम लोकप्रवाह
March 22, 2026
0

टिम लोकप्रवाह, वर्धा/ नागपूर, दि. २२ मार्च २०२६ : वर्धा जिल्ह्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे आज...

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

by टीम लोकप्रवाह
March 14, 2026
0

टिम लोकप्रवाह, जळगाव दि. 14: जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us